Cotton Crisis
Cotton Crisis esakal
जळगाव

Agriculture News : शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी? CCI बाजारात येण्याची प्रतिक्षाच

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाला दहा ते १३ हजारांचा दर मिळावा, यासाठी ९० टक्के कापूस घरात ठेवला आहे. असे असताना, सोमवारी (ता. २६) कापसाच्या दरात तब्बल एक हजारांची घसरण झाली. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कापूस दराबाबतची चिंता आणखी वाढली आहे. शेतकऱ्यांना दराबाबत आशा होती, त्यावर पाणी फिरण्याची चिन्हे आहेत.

मागील आठवड्यात आठ ते साडेआठ हजारांचा दर कापसाला होता. यामुळेच ‘सीसीआय’ने ८ आठ हजार ४०० रुपये दराने खुल्या बाजारात खरेदी सुरू करण्याचे सांगितले होते. आता मात्र कापसाचे दर कमी झाल्याने ‘सीसीआय’ काय दराने कापूस घेणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.

यंदा कापसाचा पेरा ११० टक्के झाला होता. परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी कपाशीचे नुकसान झाले असले, तरी चांगले उत्पादन हाती आले होते. बाजारात कापसाला आठ ते नऊ हजारांचा दर होता. मात्र, शेतकरी कापसाला दहा ते १३ हजारांचा दर मिळावा, यासाठी कापूस विक्रीस आणीत नव्हते.

९५ टक्के कापूस घरात असताना, शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणावा, यासाठी जिनिंग चालक कापसाला दर देत होते. वास्तविक कापसाला हमीभाव सहा हजार सहाशे रुपये आहे. हमीभावापेक्षा अधिकच दर देऊन बाजारात कापूस विक्रीस येत नाही. यामुळे जिनिंग उद्योग संकटात आला आहे.

कापूस बाजारात यावा, यासाठी ‘सीसीआय’ने खुल्या बाजारात उतरून कापूस खरेदी काही जिल्ह्यात सुरू केली. जळगाव जिल्ह्यातही खरेदी सुरू करण्याबाबत सांगणयात आले होते. मात्र, मार्केट फी शुल्कावरून तो विषय अडकला आहे.

खंडीचा दर ५७ हजार

कापसाच्या खंडीचा दर पूर्वी ६२ ते ६८ हजारांपर्यंत होता. तो रविवारी (ता. २५) ५६ ते ५७ हजारांपर्यंत खाली आला आहे. यामुळे कापसाचे दर प्रतिक्विंटल ७३०० ते ७५०० झाले आहेत. अजून काही महिने असेच दर राहतील, असे कापूस अभ्यासक सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

Chandu Champion : 'चॅम्पियन आ रहा है'...कार्तिकच्या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज; लूकची होतेय चर्चा

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update: 14 लोकांना CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळाले

SCROLL FOR NEXT