Farmer Waiting For Rain esakal
जळगाव

Jalgaon News : शेतकऱ्यांच्या नजरा ‘वरुणराजा’ कडे; पेरणीपूर्व मशागत अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मागील वर्षी पावसाने ७ जूनला हजेरी लावली होती. नंतर मात्र दहा ते १५ दिवसांच्या अंतराने पाऊस झाला. जूनच्या अखेरच्या आठवड्यापासून खऱ्या अर्थाने पावसास सुरवात झाली होती.

यंदा मात्र जूनचा अर्धा महिना उलटला, तरी पाऊस पडला नाही. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पेरण्याची पूर्ण तयार करून ठेवली अन्‌ पाऊसच होत नसल्याचे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

यंदाही पावसाळा वेळेवर सुरू होईल, असा अंदाज हवामान खात्याचा असल्याने पेरणीपूर्व मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात असून, शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. (Farmers waiting For rain final stage of pre sowing cultivation Jalgaon News)

बैलजोड्या नामशेष होण्याच्या मार्गावर

मागील वर्षी अतिवृष्टीने तूर, मुगासोबतच कपाशी या पिकांचे मोठे नुकसान होऊन उत्पादनात मोठी घट झाली होती.

अतिवृष्टीचा खरीप हंगामाला फटका बसला होता. बहुतांश शेतकरी मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर करी आहेत. यंत्रामुळे अल्पावधीत मशागत करणे शक्य असल्याने बैलजोड्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

सोयाबीनची पेरणीचा अंदाज

यंदाही सोयाबीनची पेरणी अधिक होण्याचा अंदाज आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि कपाशी हे शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. त्यासोबतच संत्रा, लिंबू पिकांकडे विशेष लक्ष आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चारा, मजुरी, मजूरटंचाई

चारा व जागमुळे शेतकऱ्यांना बैलजोडी सांभाळणे कठीण झाले आहे. कामासाठीही वेळेवर मजूर मिळणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांनी आता शेतीसाठी यंत्राची मदत घेण्यावर भर दिला आहे.

बाजारात विविध प्रकारची रासायनिक खते उपलब्ध आहेत. असे असले तरी शेतकरी आपल्या शेतात शेणखत टाकण्यास प्राधान्य देत आहेत.

सध्या शेणखत एक हजार २०० ते एक हजार ५०० रुपये ट्रॉलीप्रमाणे विकत मिळत आहे. शेणखत भरण्यासाठी मजूर, ट्रॅक्टरचे भाडे हे सर्व धरून अडीच ते तीन हजार होत असल्याचे शेतकरी सांगतात.

शेणखताला उठाव

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत घसरतो. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेणखताच्या वापराकडे वळले आहेत. शेणखताला या वर्षी चांगलाच उठाव मिळत आहे.

विविध भागांत उन्हाळी पिकांची काढणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. शेतकऱ्यांनी पेरण्यांसाठी जमीन तयार करून ठेवली असून, खते, बी-बियाण्यांची खरेदी केली आहे. सर्वच भागात अद्याप चांगला पाऊस पडला नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

"शेतात पेरणीपूर्व सर्व कामे पूर्ण झाली आहेत. केव्हा एकदाचा पाउस पडतो अन्‌ पेरण्या सुरू करतो, असे झाले आहे. १५ दिवस झाले, तरी पाऊस न पडल्याने आगामी हंगाम कसा जाईल, याबाबत शंका आहे. लवकर पाऊस पडावा, अशी प्रार्थना आम्ही करीत आहोत."

-कैलास धनके, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT