Farmers will get crop insurance jalgaon agriculture news esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Agriculture News : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अपील महाराष्ट्र शासनाने फेटाळल्याने जळगाव जिल्ह्यातील कापूस पीक विम्याचा अडसर दूर झाला आहे. जळगाव जिल्ह्यात ९५ टक्के शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे.(Farmers will get crop insurance jalgaon agriculture news)

पावसाचा खंड पडल्याने शासनाने पीक विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम देण्याचे आदेश दिले होते. नियमाप्रमाणे ही रक्कम ऑगस्ट महिन्यात मिळणे अपेक्षित होते. मात्र विमा कंपनीने शासनाचे आदेश धुडकावून फक्त मका,ज्वारी, उडीद मुग या कमी लागवड असलेल्या पिकांचा ४ कोटी विमा दिला होता.

कापूस विम्याबाबत आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. अपिलावर सुनावणीत शेतकरी प्रतिनिधी प्रा. सुभाष पाटील, सुरेश पाटील यांनी विमा कंपनीचे मुद्दे खोडून काढले होते. विमा कंपनीचा दावा खोटा उघडकीस आल्याने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विमा कंपनीचे अपील फेटाळले होते.

विमा कंपनीने पुन्हा शासनाचे मुख्य सचिव अनुपकुमार यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्यावर ३० रोजी सुनावणी झाली. या सुनावणीस आयुक्त राधाकृष्ण गमे, कृषी सहसंचालक मोहन वाघ हजर होते. शासनाने देखील विमा कंपनीचे अपील फेटाळल्याने सुमारे ७२ कोटी रुपये विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT