Sucide Case esakal
जळगाव

Jalgaon Crime News: 10 वर्षांच्या मुलासमोर व्यावसायिकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील ममुराबाद येथील वीटभट्टी व्यावसायिकाने त्याच्या १० वर्षीय मुलादेखत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

सकाळपासून ते सायंपर्यंत विहिरीत शोध सुरू होता आणि चिमुरडा आपले वडील कधी पाण्यातून बाहेर येतात, म्हणून विहिरीत डोकावत राहिला.

अखेर सायंकाळी पित्याचा मृतदेह बघताच चिमुरड्याने धायमोकलून रडायला सुरवात केली अन्‌ ग्रामस्थांचेही डोळे पाणावले. समाधान भास्कर कुंभार (वय ३८, रा. पटेल वाडा, ममुराबाद), असे मृताचे नाव आहे. (Father suicide after 10 years of children After six hours of searching body recovered from well Jalgaon News)

समाधान भास्कर कुंभार यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. गुरुवारी (ता. १५) सकाळी साडेनऊला समाधान कुंभार विटांचे ट्रॅक्टर खाली करण्यासाठी जळगावात १० वर्षीय मुलगा वैभव याच्यासह आले होते.

तेथील काम आटोपल्यावर पिता-पुत्र गावाकडे परत निघाले. ममुराबाद येथे आल्यावर म्हाळसादेवी मंदिरजवळ समाधान कुंभार यांनी ट्रॅक्टर थांबविले. मुलाला ट्रॅक्टरवर बसवून समाधान यांनी जवळच्या विहिरीत उडी घेतली.

हा प्रकार समजल्यावर ग्रामस्थांसह तरुण मदतीला धावले. काहींनी तालुका पोलिसांना घटना कळविली. पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी विहिरीत शोध सुरू केला. मात्र, समाधान यांचा ठाव ठिकाणा लागेना.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विहिरीची पाणी पातळी आणि गाळामुळे खोलवर जाऊनही काही उपयोग होईना. तब्बल सहा तासांनंतर गाळात अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला.

तेथे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मृत समाधान कुंभार यांच्या पश्चात पत्नी ज्योती, मुलगी राणी, मुलगा वैभव असा परिवार आहे. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

तो बघत राहिला वडिलांची वाट

वडिलांसोबत हिंडण्याचे कौतुक उराशी बाळगून सकाळी चिमुरडा वैभव वडील समाधान यांच्यासोबत विटाची खेप टाकण्यास जळगावला आला होता. मात्र, समाधान यांच्या डोक्यात काय सुरू आहे.

चिमुरडा वैभव याला कल्पना नसावी. गावात ट्रॅक्टर परतल्यावर पित्याने वैभवला ‘तू इथंच थांब’, असे म्हणत विहिरीच्या दिशेने धाव घेतली. वैभव डोळे लावून बघत असताना, अचानक वडिलांनी विहिरीत उडी घेतल्याने तोही विहिरीच्या दिशेने पळाला. त्याने हा प्रकार ग्रामस्थांना सांगितला. मदतीला गाव धावून आले. विहिरीतून मृतदेह निघेपर्यंत वैभव एकटक पित्याला बघण्यासाठी आसुसल्याचे पाहून अनेकांचा कंठ दाटून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Amravati Crime: अमरावती हादरली! युवकाची पूर्ववैमनस्यातून हत्या

Latest Marathi News Update LIVE: नाशिकच्या मोरे मळ्यात दहशत संपली! अखेर बिबट्या जेरबंद

Bicycle Riding: 'सोलापूरच्या चौघांनी के२के सायकल रायडिंगमध्ये रचला इतिहास'; काश्मीर ते कन्याकुमारी १६ दिवसांमध्ये ४२०० किमी प्रवास पूर्ण..

Pune Election 2025 : निवडणुकीच्या रिंगणातून माघार! पहिल्या दिवशी लोणावळ्यात नगराध्यक्ष, तर जिल्ह्यातून १४ सदस्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतले

SCROLL FOR NEXT