esakal
जळगाव

Jalgaon Crime News : वीज चोरट्याला दंडासह सक्तमजुरी; जिल्हा-सत्र न्यायालयाचा निकाल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भडगाव तालुक्यातील वीजचोरीच्या गुन्ह्यातील संशयिताला जिल्‍हा न्यायालयातील न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी एक वर्षे सक्त मजुरीसह दहा हजारांचा दंड ठोठावला. (fine of 10 thousand was imposed along with hard labor for 1 year to electricity thief jalgaon news)

डोंगरगाव (ता. भडगाव) शिवारातील पंजाबराव धनराज देशमुख यांनी पोल्ट्रीफार्म हाऊसमध्ये मका दळण्याच्या गिरणीवर महावितरण कंपनीतर्फे कनेक्शन घेतले आहे. गिरणीवरील वायर कट करून सुमारे ४४ हजार ३७५ युनिट म्हणजे दोन लाख ९३ हजार ७२० रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता अभय मनोहर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात २९ डिसेंबर २०१९ ला गुन्हा दाखल झाला होता.

या खटल्याची सुनावणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. जे. मोहिते यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी सहाय्यक अभियंता अभय पाटील यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद, प्राप्त पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षवरून पंजाबराव धनराज देशमुख यांच्यावर दोष सिद्ध झाल्याने भारतीय विद्युत कायदा कलम-२००३ चे कलम १३५ अन्वये एक वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैदाची शिक्षा ठोठावली.

आरोपीने दोन लाख ९३ हजार ७२० रुपये महावितरण कंपनीला एक महिन्याच्या आत द्यावेत, असा आदेशही दिला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील वैशाली महाजन यांनी काम पाहिले. सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय गोसावी यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT