Amalner Elgar Gazal Sammelan  esakal
जळगाव

Amalner Elgar Gazal Sammelan : अमळनेरला पहिले मराठी एल्गार गझल संमेलन

अखिल भारतीय मराठी गझल संमेलन होत असलेल्या अमळनेर नगरीला पूज्य सानेगुरुजी साहित्य नगरी नाव देण्यात आले असून, मुख्य मंचाला गझल सम्राट सुरेश भट मंच नाव देण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Amalner Elgar Gazal Sammelan : साहित्याच्या विचार व संघर्षातून अखिल भारतीय पहिले मराठी एल्गार गझल संमेलन २७ व २८ जानेवारीला देशभरातील गझलकारांच्या उपस्थितीत अमळनेरात होणार आहे. रसिकांना मराठी शायरी आणि मुशायऱ्याचे शब्दसंवाद आणि ‘वाहवाह’चे प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात निनादणार आहेत.

पहिल्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलन होत असलेल्या अमळनेर नगरीला पूज्य सानेगुरुजी साहित्य नगरी नाव देण्यात आले असून, मुख्य मंचाला गझल सम्राट सुरेश भट मंच नाव देण्यात आले आहे. (First Marathi algar Ghazal Conference at Amalner jalgaon news)

देशभरातील १७० गझलकार १७ मुशायऱ्यातून आपल्या गझल सादर करणार आहेत. या मुशायऱ्यांना दिवंगत गझलकार (स्व.) कमलाकर (आबा) देसले, म. बदिउज्जमा 'खावर', स्व. मनोहर रणपिसे, (स्व.) अरुणोदय भाटकर, म. इलाही जमादार, (स्व.) अनिल कांबळे, (स्व.) मधुसूदन नानिवडेकर, (स्व.) प्रकाश मोरे.

(स्व.) व्यंकट देशमुख, (स्व.) विनिता कुलकर्णी पाटील, (स्व.) नाना बेरगुडे, (स्व.) सुप्रिया जाधव, (स्व.) उ. रा. गिरी, (स्व.) लक्ष्मण जेवणे, (स्व.) रवींद्र ठाकूर, (स्व.) गिरीश खारकर, म. कलिम खान, (स्व.) गौरवकुमार आठवले यांची नावे देऊन त्यांना गझल आदरांजली वाहण्यात येणार आहे.

गझल संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्य अभ्यासक शंभू (आण्णा) पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षपद शिवाजी जवरे (बुलढाणा) हे भूषवणार आहेत. तर स्वागताध्यक्ष मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील असतील.

प्रमुख अतिथी म्हणून दगडू लोमटे (अंबाजोगाई), नाना लोढम (अमरावती), शरद पाटील (संचालक केमिनोव्हा ऍग्रोटेक शहादा) हे हजर राहणार आहेत.

हे जगण्याचे भाषांतर...(काळजाचा काळजाशी थेट संवाद) हा गझल गायन कार्यक्रमात राहुलदेव कदम (लातूर), संकेत नागपूरकर (नागपूर) हे गझल गायन करणार आहेत.

गोपाळ मापारी (बुलढाणा ) निवेदन करणार आहेत तर योगेश संदानशिव तबला, जितेश मराठे (जळगाव) हार्मोनियम, स्वराज्य भोसले (पुणे) गिटार.

आइनोद्दीन वारसी (देगलूर) बासरीची साथ देणार आहेत. ‘मराठी गझल : आजची व उद्याची आव्हाने’ या विषयावर परिसंवाद होणार असून, यात अध्यक्ष प्रमोद खराडे (पुणे), संजय गोरडे (नाशिक), शांताराम खामकर (अहमदनगर), अनंत नांदूरकर (खलिश) नागपूर हे वक्ते सहभागी होणार आहेत.

..या गझलकारांची राहणार उपस्थिती

गझल संमेलनात सविता महेश सामंत (गोवा), अरुण सावंत (नवी दिल्ली), नितीन वायाळ, भरुच (गुजरात), प्रथेश तुगावकर (हैद्राबाद), ललित बोरकर (सुरत), सतीश दराडे (बीड), नितीन देशमुख (अमरावती), शिव डोईजोडे (उदगीर), दत्तप्रसाद जोग (गोवा) आदी गझलकार उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT