After the transfer of power, of 'DPDC' First meeting on Monday esakal
जळगाव

Jalgaon : सत्तांतरानंतर DPDCची सोमवारी पहिलीच सभा; 25 टक्के निधी अद्यापही अखर्चित

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन भारतीय जनता पक्ष व शिंदे शिवसेना गटाची सत्ता आली. या सत्तांतरानंतर जळगाव जिल्हा वार्षिक नियोजन समितीची सभा सोमवारी (ता. २१) होणार आहे. या सभेत वितरित केलेल्या निधीपैकी २५ टक्के अद्यापही खर्च होणे बाकी आहे. यावरून सभेत वादळी चर्चा होऊन अधिकारी फैलावर घेतले जाण्याची शक्यता आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सकाळी अकराला ही सभा होईल. पालकमंत्री गुलाबराव पाटील अध्यक्षस्थानी असतील. खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, सर्व आमदार या वेळी उपस्थित राहतील. (First meeting of DPDC after power transition on Monday 25 percent of funds still unspent Jalgaon News)

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक अंदाजपत्रकात ५९९ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी केवळ २०८ कोटी रुपये बीडीएस प्रणालीद्वारे जिल्ह्यास उपलब्ध झाले आहेत. त्यातील ७४ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे.

ऑक्टोबर महिन्याअखेर ५७ कोटी ३९ लाखांचा खर्च विविध योजनांवर झाला आहे. वितरित निधीपैकी ७६ टक्के खर्च झाला आहे. अद्यापही २५ टक्के खर्चित होणे बाकी आहे. मागील वर्षीही मार्चअखेर निधी अखर्चित राहिला होता. तसा निधी यंदा खर्चाविना शिल्लक नको पाहिजेत, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या आहेत. तरीही निधी अखर्चित राहात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

Bigg Boss Marathi 6 Live Update: लीलाच्या एजेची राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

Bigg Boss Marathi 6 : घरची गरीबी, थॅलेसेमियाशी झुंज देणाऱ्या रीलस्टार डॉन प्रभू शेळकेची Entry !

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

SCROLL FOR NEXT