Stair work from Shivaji Nagar started by Railways.
Stair work from Shivaji Nagar started by Railways. esakal
जळगाव

Railway Bridge : रेल्वेतर्फे फुटवेअर दादऱ्याचे काम सुरू; नागरिकांना रहदारीचा मिळणार दिलासा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिवाजीनगर भागातून रेल्वेस्थानकाच्या (Railway) पलीकडे जाण्यासाठी फुटवेअरची सुविधा करावी, अशी मागणी नागरिकांची होती. (foot bridge for Shivaji Nagar will be started by Railways citizens will get relief from traffic jalgaon news)

त्यासाठी नागरिकांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेटही घेतली होती. रेल्वेतर्फे आता फुटब्रिजचे काम सुरू करण्यात आले आहे.

शिवाजीनगर भागाकडून गावात जाण्यासाठी रेल्वेचा जीना होता. मात्र, रेल्वेतर्फे या ठिकाणी रेल्वेरूळाची सहावी लाईन टाकली होती. परिणामी, शिवाजीनगरवासीयांचा गावात जाण्याचा मार्ग बंद झाला होता. नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून जावे लागत होते.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

रूळावर रेल्वेगाडी आल्यास नागकिरांना अडचण येत होती. कधी कधी कपलींगमधून मार्ग काढावा लागत होता. नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे रेल्वेने फुटब्रिजचे काम त्वरित करावे, अशी मागणी या भागातील नगरसेवक,

नागरिक व सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम यांची भेट घेऊन केली होती. त्यानंतर पाठपुरावा केला होता. आता रेल्वेतर्फे या फुटब्रिजचे काम शुक्रवार (ता. २४)पासून सुरू करण्यात आले आहे. या ब्रिजमुळे शिवाजीनगर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT