Forced labour to factory workers of Bhadgaon in crime of electricity theft jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : रिमोटने वीज मिटर बंद करणे भोवले; भडगावच्या कारखानदाराला सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : वीज चोरीच्या गुन्ह्यात टोणगाव (ता. भडगाव) येथील कारखानदाराला जिल्‍हा न्यायालयाने १ वर्ष सक्त मजुरीसह १० हजारांची शिक्षा ठोठावली आहे.

२०१८ मध्ये वीजचोरी प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात रऊफ अली अहमदअली याच्याविरुद्ध विजमंडळाने गुन्हा दाखल केला होता. त्यावर मंगळवारी (ता. ८) निकाल झाला. (Forced labour to factory workers of Bhadgaon in crime of electricity theft jalgaon crime news)

रऊफ अली अहमद अली (रा. गट. नं. १४/१) यांचा टोणगाव औद्योगीक परिसरात कारखाना आहे. या कंपनीत अचानक विद्युत विभागाच्या व्हिजीलन्स विभागाने छापा टाकून विज मिटर तपासणी केली असता, विद्युत मिटरच्या बॉडीवर असलेले सर्व बाजुंचे सिल तोडलेले आढळून आले.

तसेच, सुरक्षा स्टिकरही क्रॅक होते. कुणीतरी हे विजमिटर हाताळल्याचे स्पष्ट जाणवत असल्याने अधिकाऱ्यांनी विद्युत पुरवठा आणि वापर यासाठी विशीष्ठ यंत्राद्वारे या कंपनीतील मिटरची तपासणी केली. त्यात, कंपनीतील यंत्र सामुग्रीकडून वापर होणारी विज आणि त्या तुलनेत मिटरचे रिडींग यात गडबड असल्याचे आढळले.

वापरकर्त्या कारखानदाराने रिमोट कंट्रोल अथवा जामरद्वारे मिटर रिडींग थांबवल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्याने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. संशयीत कारखानदाराने २४ महिन्यांत १ लाख ११ हजार ७८९ इतक्या विद्युत भार (युनिटची) चोरी करुन विद्युत कंपनीचे १५ लाख ३३ हजार ६९० रुपयांचे आर्थीक नुकसान केले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या प्रकरणी विज अभियंत्यांच्या तक्रारीवरुन भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्ह्याचा तपास पुर्ण होवुन दोषारोप पत्र न्यायालयात सादर झाल्यावर न्या. जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरु झाले. सरकारी अभियोक्ता वैशाली महाजन यांनी ६ महत्वपुर्ण साक्षीदारांच्या साक्ष न्यायालयात नोंदविल्या.

शिक्षा, दंड आणि वीज भरणाही

प्राप्त पुरावे, दस्तऐवज, तज्ञांचा अहवाल आणि तपासाधिकाऱ्यांची साक्ष याच्या आधारावर संशयीत रऊफ अली अहमद अली याच्याविरुद्ध दोषारोप सिद्ध झाले. न्यायालयाने भारतीय विद्युत कायदा कलम- १३५ प्रमाणे १ वर्ष सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे संशयीत आरोपीला १५ लाख ३३ हजार ६९० रुपये ३ महिन्याच्या आत विज कंपनीला भरणा करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT