Students from abroad taking darshan of Gaurai. esakal
जळगाव

Jalgaon Ganeshotsav News : विदेशी विद्यार्थ्यांनी घेतला गौरींच्या प्रसादाचा आस्वाद; गणेशोत्सवातही झाले सहभागी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Ganeshotsav News : रोटरी युथ एक्सचेंज उपक्रमांतर्गत जळगावात आलेले फ्रान्स येथील पियर मारी व मेक्सिको येथील विक्टर बाल्को हे दोन विद्यार्थी सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा आनंद घेत आहेत.

. (Foreign students celebrated ganeshotsav jalgaon news)

गणेशोत्सवादरम्यान गौरींच्या प्रसादाचाही त्यांनी अस्वाद घेतला. रोटरी वेस्टच्या मानद सचिव मुनिरा तरवारी त्यांच्यासोबत होत्या.

गणेश चतुर्थीला या विद्यार्थ्यांनी नवीपेठ गणेश मंडळाची स्थापना मिरवणूक बघून त्यात सहभागी होत आनंद लुटला. तसेच, आशिष उपासनी व रवींद्र धुमाळ यांच्या निवासस्थानी गौरी अर्थात्‌ महालक्ष्मी पूजन व दर्शनासोबतच त्यांनी आरती आणि भोजनाचाही आस्वाद घेतला.

आशिष अजमेरा यांच्या शाळेत इतर विद्यार्थ्यांसमवेत त्यांनी भंडाऱ्याचा अनुभव घेतला. दीपा कक्कड व राधिका शर्मा यांच्या संस्थेच्या गणेश विसर्जनावेळी उपस्थित राहून विक्टर व पियर या दोघांनी या पद्धतीविषयी माहिती घेतली. भारतातील गणेशोत्सव हा ऐकून होतो. मात्र, प्रत्यक्ष आम्हाला तो जळगावात येऊन अनुभवता येत आहे, असा आनंददेखील त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फी न दिल्यानं परीक्षेला बसू दिलं नाही, विद्यार्थ्यानं पेटवून घेतलं; प्राचार्य म्हणाले, २५ हजाराचा फोन अन् १ लाखाची गाडी वापरतो

Maharashtra Politics: डोंबिवलीत राजकीय पलटवार! भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेश

Gujarat Ats : गुजरात एटीएसची मोठी कारवाई: 'रायसिन' विष तयार करणाऱ्या डॉक्टरसह तीन जण अटकेत!

Indian History : भारताचा इतिहास केवळ राजा, सैन्य आणि विजयापुरता मर्यादित नाही; डॉ. कृष्ण गोपाल!

कल्याण डोंबिवलीत ठाकरेंसह शिंदेंना धक्का, भाजपने एका दगडात मारले दोन पक्षी; बड्या नेत्याचा भाजपप्रवेश

SCROLL FOR NEXT