Air services will start from jalgaon to  Pune Goa and Hyderabad jalgaon news
Air services will start from jalgaon to Pune Goa and Hyderabad jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News: विमानसेवेने अर्थकारण बदलणार, मार्गाचे अडथळेही हटवा; माजी महापौरांचे आयुक्तांना पत्र

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरात लवकरच विमानसेवा सुरू होत आहे. त्यामुळे जळगावचे अर्थकारणही बदलणार आहे.

परंतु विमानसेवा सुरू होणाऱ्या विमानतळापर्यंत जाणाऱ्या अजिंठा चौफुली ते कुसुंबा विमानतळ मार्गावरील अडथळे हटविण्यासाठी महापालिकेने तत्पर असले पाहिजे, असे पत्र माजी महापौर व शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन लढ्ढा यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांना पाठवले आहे. (Former Mayor Nitin Laddha letter to Commissioner about jalgaon aeroplane service news)

माजी महापौर लढ्ढा यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्राचे विशेष महत्त्व आहे. महापालिकेत लोकनियुक्त पदाधिकारी व नगरसेवक असताना माजी महापौर नितीन लढ्ढा सत्ताधारी शिवसेनेचे नेते होते, त्या वेळी त्यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना सभागृहात अनेकवेळा विकासाबाबतच्या चर्चेत सहकार्य केल्याचे दिसून आले.

आज महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड स्वतंत्र प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत. परंतु शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आयुक्तांना पत्र लिहून लढ्ढा यांना मागणी करावी लागली हेच विशेष!. आयुक्त त्यांच्या पत्राला किती सकारात्मक घेतात, हेच आता जळगावकर पाहणार आहेत.

लढ्ढा पत्रात म्हणतात, की ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर, हरित शहर साक्षर शहर’ही जळगावकरांची माफक अपेक्षा आणि या अपेक्षापूर्तीचे आपण ध्येय घेऊन असालच आपल्याला विनंतीपूर्वक सांगतो, की जळगावचे अर्थकारण बदलण्यास विमानसेवेची मदत होणारच आहे. ही सेवा सुरू होत असताना महापालिकेनेही तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

शहराची विमानसेवा येत्या फेब्रुवारीपर्यंत सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अजिंठा चौफुली ते कुसुंबा विमानतळापर्यंत रस्त्यावर अनेक अडथळे आहेत ते हटविण्याची गरज आहे. तसेच तेथे सुविधांचीही गरज आहे.

एमआयडीसीत हजारो कामगार तसेच उद्योजक आहेत. मात्र त्यांच्या सुविधांकडे लक्ष दिले जात नाही, ते अक्षरशः जीव मुठीत घेऊन याच रस्त्यावरून प्रवास करीत असतात. कारण रस्त्यात पथदीप नाहीत. चौकांचे सुशोभीकरण नाही, दुभाजकात कोणतीही झाडे, मार्गदर्शक फलके नाहीत, अशी अनेक कारणे आहेत. फक्त नवीन रस्ते बनविण्यावर भर देण्यापेक्षा वीज व सिग्नल व्यवस्थाही गरजेची आहे.

अतिक्रमण त्वरित हटवा

अजिंठा चौफुली ते कुसुंबा विमानतळ हा रस्ता छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा महामार्ग आहे. संपूर्ण महामार्गावर विक्रेत्यांचे अतिक्रमण झाले आहे. तसेच येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छ आहे. त्यामुळे हे अतिक्रमण काढून रस्ता स्वच्छ करण्याची गरज आहे.

आमदार किंवा मनपा फंडातून कामे करा

रस्त्याची विकासकामे करण्यासाठी आमदार निधी किंवा जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी उपलब्ध करावा किंवा महापालिकेच्या फंडातून ही कामे करावीत, जेणेकरून भविष्यात या रस्त्यावर होणारे अपघात टाळून जीवितहानीही टाळता येईल. महापालिका आयुक्तांनी हा विषय अत्यंत गांभीर्यपूर्वक घ्यावा, असे आवाहनही लढ्ढा यांनी केले आहे.

खासदार पाटीलही अकार्यक्षम

माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या अकार्यक्षमतेबाबतही पत्रात उल्लेख केला आहे, त्यांनी म्हटले आहे, की खासदार उन्मेष पाटील यांच्याशी आपण १३ फेब्रुवारी २०२३ ला स्वत: फोनवर चर्चा करून या रस्त्यांबाबत समस्या मांडल्या होत्या. त्यांनी पंधरा दिवसांत हा विषय मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र आज दहा महिन्यांनंतरही कोणत्याच विषयावर काहीच कार्यवाही झालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT