Crime news  esakal
जळगाव

लग्नानंतर दागिने, रोकड घेऊन पळालेल्या वधूसह चौघे अटकेत

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घरातील रोकड व दागिन्यांसह चतुर्भुज झाल्यानंतर वर पक्षाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून नववधूसह चौघांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा (जि. जळगाव) : दलालांमार्फत लग्न लावून आणलेली नववधू लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घरातील रोकड व दागिन्यांसह चतुर्भुज झाल्यानंतर वर पक्षाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून नववधूसह चौघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सांगितले, की विवाह होत नसल्याने २७ वर्षीय युवकाने आपल्या परिचयातील पळसपूर (ता. शिरपूर) येथील व्यक्तीशी संपर्क करून लग्न जुळवण्यासाठी सुरेश आर्य (रा. सेंधवा) यांच्याशी बोलणे केले. दलालामार्फत मध्यस्थी झाल्यानंतर वधूला एक लाख ६० हजार रुपये, दागिने व साडी असा ऐवज देऊन तिचा तरुणासोबत विवाह उरकण्यात आला. मात्र, विवाह झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घरातील कपाटातील २५ हजार रुपये रोख व दागिने घेऊन नववधू रात्रीच पसार झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणाने पिंपळगाव हरेश्वर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सुरेश आर्य (रा. सोनवळ, सेंधवा), अनिल धास्त (रा. मोहमांडळी, खरगोन), हाकसिंग पावरा (रा. हेद्रयापाडा, शिरपूर) व कलीता उर्फ लक्ष्मी किराडा (रा. मोहमांडळी, खरगोन) या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रवींद्रसिंग पाटील, पंकज सोनवणे व महिला पोलीस योगिता चौधरी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Maharashtra Rain : डीप डिप्रेशन वादळी स्थिती; अल् निनोला भेदून महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज आला समोर

Student Protest: विद्यार्थी, शेतकरी आंदोलनाची तयारी; ‘सीजेपी’ आणि संयुक्त किसान मोर्चा सरकारविरुद्ध आक्रमक

ब्रेकिंग! मोहोळ तालुक्यातील चिंचोळी ‘एमआयडीसी’त बनावट दारूची फॅक्टरी; कारवाई संपायला लागले १२ तास; ‘एक्साईज’च्या अधीक्षक म्हणाल्या, १५ वर्षांतील सर्वांत मोठी कारवाई

Commonwealth Games 2026: नाशिकच्या दिलीप गावितला 'सुवर्ण'; Goosebumps आणणारा Video! २ रौप्यपदकांसह भारताने सहाव्या दिवशी पक्की केली ६ पदकं

WHO IS DILIP GAVIT? ५ वर्षांचा असताना झाडावरून पडला अन् हात गमावला... शेतमजूराच्या पोरानं राष्ट्रकुल स्पर्धेत 'सुवर्ण'अध्याय लिहिला; संघर्षमय कहाणी

SCROLL FOR NEXT