thief esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पिंप्राळ्यात घरफोडी; चौघांना अटक

प्रतीक जोशी, सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : आजी वारल्यामुळे संपूर्ण कुटुंबिय गावी गेलेले असल्याने पिंप्राळ्यातील सेंट्रल बँक कॉलनीतील बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारला.

याप्रकरणी मंगळवारी (ता. १०) रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर चार संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Four arrested in burglary jalgaon crime news )

प्रशांत गणेश माहोरे यांच्या आजीचे गेल्या ३ ऑक्टोंबरला निधन झाले. त्यामुळे माहोरे कुटुंबिय आलेगाव (जि. अकोला) येथे गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरातील रोकड आणि सोने चांदीचे दागिने असा एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

५ ऑक्टोंबरला दुपारी जेव्हा श्री. माहोरे हे घरी येण्यासाठी निघाले, त्यावेळी लहान भावाने त्यांना भ्रमणध्वनीद्वारे याबाबत कळविले. मंगळवारी तक्रार दाखल केल्यानंतर चौघा संशयतांनी घरफोडी केल्याचे उघड झाले.

त्यानुसार रामानंदनगर पोलिसांनी सागर राजाराम गवई (वय २३, रा. पिंप्राळा, हुडको), अब्रार अमित खाटीक (वय १८, रा. उस्मानिया पार्क), समीर शेख इकबाल (वय २२, दूध फेडरेशन हुडको) व अमोल प्रकाश शिरसाठ (वय २५, रा. दूध फेडरेशन हुडको) यांना अटक केली.

पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुशिल चौधरी, संजय सपकाळे, राजेश चव्हाण, हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सुर्यवंशी, रविंद्र चौधरी, जुलालसिंग परदेशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT