Cotton News esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : कापूस व्यापाऱ्याकडून मापात पाप; वाकडीत शेतकऱ्यांची अडीच लाखांत फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : वाकडी येथे कापूस खरेदी करण्यासाठी आलेल्या धुळे येथील व्यापाऱ्याकडून मापाप पाप केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता. १२) उघडकीस आला.

या प्रकरणी व्यापारी व मध्यस्थ व ट्रकचालक अशा तिघांविरूद्ध फसवणूक केल्याचा पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Fraud of cottan farmers for two and half lakhs jalgaon fraud crime news )

वाकडी येथे बुधवारी (ता. ११) कापूस खरेदी करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील चितोड येथील व्यापारी संशयित अभिजीत रवींद्र साळुंखे याने वडगाव (ता. जामनेर) येथील मध्यस्थी नाना चिंधू कोळी याला कापूस खरेदीसाठी पाठविले होते. वाकडी येथील शेतकरी महेंद्र लोखंडे यांचा कापूस सात हजार रुपये प्रति क्विंटल या प्रमाणे भाव करून मंगळवारी (ता. १०) मोजण्यासाठी ट्रकसह व्यापाऱ्याची माणसे गावात आली.

महेंद्र लोखंडे यांनी प्रत्येक वेचणी वेळी मोजून भरलेल्या कापसात तब्बल आठ ते दहा क्विंटल कापूस कमी भरत असल्याची शंका आल्याने कापूस मोजताना काट्यावर व तोलावर लक्ष ठेवून मापारी काटा मारत आहे, असे लक्षात आल्यावर रंगेहाथ पकडले व ही बाब गावकऱ्यांना समजल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ झाला.

आपली चूक शेतकऱ्यांच्या लक्षात येताच मापारी व हमालांनी पळ काढला. मात्र शेतकऱ्यांनी चालकासह ट्रक ताब्यात घेत फत्तेपूर पोलिसांना बोलावून ताब्यात देण्यात आला. भरण्यात आलेली आयशर गाडी फत्तेपूर येथील तोल काट्यावर १७ क्विंटल ९० कापूस मोजणी केली असता ५ क्विंटल ५० किलोचा फरक आढळून आला.

शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला गावात बोलावले. मात्र तो न आल्याने व शेतकऱ्यांचा संताप आनावर झाल्याने व्यापारी व मध्यस्थी यांच्यावर रात्री उशिरा आयशर ट्रक (क्रमांक एमएच १८, बीजी २४९२) चालक संशयित सुरेश बुधा मोरे याच्यासह संशयित अभिजित साळुंखे (धुळे) व नाना कोळी याच्याविरुद्ध २ लाख ४९ हजार ६१० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पहूर पोलिसात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT