farmer esakal
जळगाव

Fraud : हरितगृह उभारणीच्या नावाने शेतकऱ्याची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : शेतात हरितगृह उभारण्यासाठी रक्कम घेऊनही काम पूर्ण न करणाऱ्या दोघांना ग्राहक मंचाने नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

अशोक वना बाविस्कर (रा. गांधली, ता. अमळनेर) यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतात २० गुंठा जागेत हरितगृह उभारणी करण्यासाठी सचिन उत्तम मोरे, समृद्धी ग्रीन हाऊस, समृद्धी ग्रीन हाऊस कन्स्ट्रक्शन यांना दिले होते.

यासाठी त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार ७२० रुपये प्रति स्के.मीटरप्रमाणे काम देऊन ११ हजार रुपये बेणे देण्यात आले होते. तसेच वेगवेगळे दोन धनादेश देऊन पाच लाख रुपये देण्यात आले होते. तर उर्वरित ६ लाख ८० हजार रुपये शासकीय अनुदान आल्यावर देण्याचे ठरून कामाचा करारनामा करण्यात आला होता. त्यानुसार तक्रारदाराने २ लाख २० हजार रुपयांचे साहित्य आणून कामास सुरवात केली होती. मात्र, कंपनीने फक्त पाइप आणून खड्डे खोदले होते. त्यानंतर मात्र काम अपूर्ण सोडण्यात आले होते. तक्रारदार यांनी काम पूर्ण करण्याबाबत कंपनी व त्यांचा अधिकृत प्रतिनिधी यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. म्हणून तक्रारदाराने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करून झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून व्याजासह ३८ लाख ३१ हजार रुपये मिळावेत, अशी मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार पूनम मलिक (सदस्या) तसेच प्रभारी अध्यक्षा व सुरेश जाधव (सदस्य) जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जळगाव यांनी समृद्धी ग्रीन हाऊस कन्स्ट्रक्शन व त्यांचे अधिकृत प्रतिनिधी सचिन उत्तम मोरे यांना तक्रारदार अशोक वना बाविस्कर यांना ५ लाख ६९ हजार ४५० रुपये तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम देईपर्यंत ९ टक्के व्याजाने परत करावे. तसेच झालेल्या त्रासाबद्दल ५० हजार व अर्जाचा खर्च ५ हजार असे परत करण्याचे आदेश दिले. तर यातील तिसरे संशयित जिल्हा कृषी अधीक्षक यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तक्रारदाराकडून ॲड. भारती अग्रवाल यांनी युक्तिवाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अवघ्या १५ रुपयांत विकले जाताहेत अशोक खरातच्या अत्याचाराचे अश्लील व्हिडिओ; खळबळजनक प्रकाराने संतापाची लाट

Solapur Crime: अवंतीनगरात अडीच तोळ्यांचे गंठण हिसकावले; शहर गुन्हे शाखेच्या सात पथकांसह तीन पोलिस अधिकारी तपासात!

Nashik News : कंत्राटदारांचे ९६ हजार कोटी थकीत; १५ एप्रिलपर्यंत देयके न मिळाल्यास कठोर पावले उचलण्याचा शासनाला इशारा

Career Numerology : राजयोग घेऊन जन्माला येतात 'या' 4 मुलांकाचे लोक; सरकारी नोकरीत मिळवतात यश, पण एक चूक बर्बाद करते आयुष्य

Latest Marathi News Live Update: चंद्रपूरमध्ये डीजेवर नाचताना तरुणानं गमावला जीव

SCROLL FOR NEXT