fighting  esakal
जळगाव

Jalgaon : कौटुंबिक वादातून न्यायालयासमोर 2 गटांत ‘फ्री स्टाइल’

प्रदिप वैद्य

रावेर (जि. जळगाव) : कौटुंबिक वादातून येथील न्यायालयासमोर दोन गटांत हाणामारी (Fight) होऊन तीन जण जखमी (Injured) झाले. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून रावेर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. (Freestyle fight before court in 2 groups over family dispute Jalgaon Crime News)

विनोद कोळी (रा. नायगाव, ता. मुक्ताईनगर) हा त्याच्या मित्रांसोबत सोमवारी (ता. १३) येथील न्यायालयात आला होता. त्या वेळी न्यायालयाजवळून जात असताना ईश्वर कोळी, दीपक कोळी व पूनम कोळी (सर्व रा. कांडवेल, ता. रावेर) यांनी कौटुंबिक वादाच्या कारणावरून दोघांना मारहाण केली तर विनोद कोळी याच्या डोक्यात दगड मारून शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात विनोद कोळी यांच्या फिर्यादीवरून ईश्वर कोळी, दीपक कोळी, पूनम कोळी (सर्व रा. कांडवेल) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर समाधान कोळी व विनोद कोळी यांनी ईश्वर कोळी यास मारहाण केली. तसेच विनोद याने दगड उचलून मारला यामुळे ईश्वर जखमी झाले. याबाबत पूनम कोळी यांनी रावेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT