SIDBI Deputy General Manager Priyanka Gaikwad and dignitaries guiding on Sunday at the conclusion of a training camp for women on banana chips and food processing. esakal
जळगाव

Jalgaon: केळीपासून गुलाबजाम, नानखटाई अन् बरेच काही! रावेर येथील प्रशिक्षण शिबिरात महिलांनी बनविले 30 पदार्थ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon : केळीपासून केवळ वेपर्सच नाही, तर विविध पदार्थ तयार होऊ शकतात, हे एक महिन्याच्या प्रशिक्षणामुळे सिद्ध झाले आहे.

यामुळे केळी उद्योगाला नवीन आकार मिळणार असल्याचे प्रतिपादन ‘सिडबी’च्या उपमहाप्रबंधक प्रियांका गायकवाड यांनी केले. शिबिरात २१ महिलांनी केळीपासून गुलाबजाम, नानखटाई, लाडू, चॉकलेट आदी तीस पदार्थ बनविले. (From Bananas to Gulab Jam Nankhatai and more Women made 30 dishes at training camp in Raver jalgaon)

येथे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी) व युथ बिल्ड फाउंडेशन यांच्यातर्फे केळी चिप्स व अन्नप्रक्रिया याबाबतचे महिलांसाठी एक महिन्याचे प्रशिक्षण शिबीर नुकतेच झाले.

येथील ओमकारेश्‍वर महादेव मंदिरासमोरील देविदास शिंदे यांच्या हॉलमध्ये या प्रशिक्षणाचा समारोप झाला. राईज अँड शाईन कंपनीतर्फे केळीचे रोप देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

महिलांनी केळीपासून व इतर अन्न पदार्थांपासून बनविलेल्या विविध खाद्य पदार्थांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

यात सविता नारखेडे (केळीच्या पिठाची नानखटाई), मंगला महाजन (केळीच्या पिठाचे लाडू), सुनीता महाजन (केळीचे चॉकलेट), रुक्मिणी लोहार (चीज बॉल), भारती महाजन (केळीची भाजी), जोत्स्ना महाजन (केळीचे फुणके),

कल्पना तेली (नानखटाई), संगीता गोसावी (केळीची एढणी- धिरडे), स्वाती अटवालकर (केळीचे भजे), संगीता पाटील (केळीचे थालीपीठ व पापड, शंकरपाळे), शीतल तांबे केळीचे (चॉकलेट व मिल्कशेक), राजश्री चौधरी (केळीचे गुलाबजामून),

नम्रता दोडके (केळीचे लाडू), ज्योती महाजन (केळी व साबुदाणा मिक्स वडा), अर्पिता गजेश्‍वर (बीटची पुरी), शीतल भावसार (मंचुरियन), वर्षा वाणी (केळीचे भजे व मुगाचे वडे), शुभांगी लोहार (कच्च्या केळीचे वडे व मिल्कशेक), कुसुम जगताप (केळीची जेली, शीतल तेली, केळीचा केक), कविता गोडसे (केळीचा चिवडा, चिप्स व बर्फी).

उपस्थितांनी प्रदर्शनाचे निरीक्षण करून पदार्थांचा आस्वाद घेतला. हे प्रदर्शन व प्रशिक्षणार्थींचा उत्साह बघून सर्व उपस्थित भारावून गेले.

केळीपासून आता मोठ्या प्रमाणावर इतर बरेच अन्न पदार्थ बनविले जावू शकतात, असे प्रतिपादन सिडबीच्या उपमहाप्रबंधक प्रियांका गायकवाड यांनी केले.

केळीवर आधारित उद्योगांसाठी योग्य कागदपत्रे सादर करून शासकीय योजनांच्या अंतर्गत सेंट्रल बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रणयकुमार झा यांनी दिली.

उद्योग उभारणीबाबत युथबिल्ड फाउंडेशन व मिमा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे सहाय्यक संचालक डॉ. अमित पाटील यांनी मार्गदर्शन केले. रुक्मिणी लोहार, सुनीता महाजन, वंदना पाटील, शीतल तांबे या प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त केले.

व्यासपीठावर ‘सिडबी’च्या उपमहाप्रबंधक गायकवाड, सिडबीचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रबंधक सीमांत पारधी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. झा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया रावेर शाखेचे व्यवस्थापक पवन चौधरी, युथबिल्ड फाउंडेशन व मिमा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे सहाय्यक संचालक डॉ. अमित पाटील, मिमाचे आतिक बिजापुरे, मिमाचे कुशल प्रशिक्षक हेमंत ठोमरे, प्रशिक्षण समन्वयक विजय पाटील होते.

राजेंद्र गणवीर यांनी सूत्रसंचालन केले. विजय पाटील यांनी आभार मानले. विनिता वैद्य, वंदना पाटील, शारदा पाटील, एकता पाटील, रोहित पाटील यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT