Criminal Nirmala Pawar arrested
Criminal Nirmala Pawar arrested esakal
जळगाव

Jalgaon : जन्मठेपेच्या शिक्षेतील फरार महिलेस अटक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नाशिक मध्यवर्ती कारागृहात (Nashik Central Jail) खुनाच्या गुन्ह्यात (Murder case) जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या महिला कैदी रजेवर सुटल्यानंतर फरार झाली होती. भडगाव पोलिसांत याप्रकरणी गुन्हाही दाखल केला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे निर्मलाबाई अशोक पवार (रा. टोणगाव, ता. भडगाव) यांना अटक करुन न्यायालयात हजर केले. (Fugitive woman arrested for life imprisonment Jalgaon Latest Crime News)

कोरोना महामारीच्या काळात गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यभर आणि देशभर शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना कोविड अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. याच वेळी भडगाव येथील रहिवासी तथा खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या निर्मलाबाई अशोक पवार (वय ५१) यांनाही नाशिक कारागृहातून अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे, निर्मलाबाई यांनी ५ जून २०२२ पर्यंत कारागृहात पोहचणे आवश्यक असताना त्या वेळेत पोहचल्या नाही. तसेच दिलेल्या पत्यावरुन गायब असल्याने त्यांच्याविरुद्ध भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाच्या सूचनेवरून संशयित महिलेचा शोध सुरु असताना ती, भडगाव येथे परतली असून पत्ता बदलून वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यांच्या पथकातील महिला कर्मचारी रत्ना मराठे, रुपाली खरे, राजेंद्र पवार अशांसह पथकाला रवाना केल्यावर निर्मलाबाई पवार या टोणगाव (ता. भडगाव) येथे आल्या असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्यावर निर्मलाबाईची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप

अटकेतील निर्मलाबाई पवार (वय ५१) यांना दहा वर्षांपूर्वी (वर्ष २०११) मालेगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात जिल्‍हा न्यायालयाने (१९ डिसेंबर २०१३) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून तेव्हापासून त्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होत्या. पॅरोल रजेवर सुटल्यानंतर वेळेत परतणे अपेक्षीत असताना फरार झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पंतप्रधानांना तेलंगणात मतं मागण्याचा अधिकार नाही; आम्हीच 14 जागा जिंकू - रेवंथ रेड्डी

Healthy Diet: पौष्टिक पदार्थांचा अभाव हे अनेक आजारांचं कारण; ICMR च्या तज्ज्ञांनी सांगितलं कशी असावी रोजची थाळी?

Mumbai Indians : मुंबईसाठी कर्णधार म्हणून पहिल्याच हंगामात हार्दिक पांड्या अपयशी! नावावर केला लज्जास्पद विक्रम

Kolhapur Lok Sabha : वाढला मतदानाचा टक्का, कोणाला बसणार धक्का; 'या' मतदारसंघातील मतदान ठरणार निर्णायक

Akshaya Tritiya 2024 : अक्षय तृतीयेच्या निमित्ताने काढा फुलांच्या अन् स्वस्तिकच्या सोप्या रांगोळ्या, अंगणाला येईल शोभा..!

SCROLL FOR NEXT