Chavan painter painting on Ganesha idol. eskal
जळगाव

Ganeshotsav 2023 : गणेशमूर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात; मूर्तीचे साहित्य २० ते २५ टक्क्यांनी महागले

सकाळ वृत्तसेवा

Ganeshotsav 2023 : गणपती उत्सवाला पंधरा दिवस दिवस बाकी आहेत. मूर्तिकारांचे मूर्ती रंगकाम अंतिम टप्प्यात आहे. उत्सवासाठी मंडळ समिती गठीत करण्याची लगबग सुरू आहे. मूर्ती तयार करण्याच्या साहित्यात २० ते २५ टक्के वाढ झाल्यामुळे गणेशोत्सवावर महागाई व पाऊस न पडल्याने दुष्काळाचे सावट आहे. तरीही गणेश भक्तांची लगबग सुरू आहे.

यंदा सुरुवातीला पावसाळा लांबला. जुलैमध्ये चांगला पाऊस झाला. मात्र ऑगस्ट कोरडा गेल्यामुळे तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. मात्र वर्षाचा उत्सव असल्याने युवक वर्गात श्री स्थापनेसाठी लगबग सुरू झाली आहे. (ganeshotsav Painting of Ganesha idol in final stage jalgaon news)

मूर्ती तयार करण्याच्या साहित्यात वाढ

यावर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या किमतीत एका गोणीमागे वीस रुपयांची वाढ झाली आहे. नारळ, दोरीत शंभर, रंगांच्या किमतीत वीस टक्के तर मजुरीत पन्नास रुपयांची वाढ झाली आहे. या मुळे गणपती मूर्तींच्या किमतीत वीस टक्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर शाडू मातीच्या किमतीत या वर्षी वाढ झालेली नाही.

गणेशमूर्ती तयार करण्याचे काम पूर्ण

शहरात चव्हाण आर्ट, प्रजापती आर्ट व बऱ्हाणपूर रोडवरील कुंभार समाजातर्फे दीड ते बारा फूट उंचीच्या सुमारे दहा हजारांहून अधिक गणेश मूर्ती तयार करण्यात आलेल्या आहेत. मूर्तीकाम पूर्ण होऊन मूर्तिकारांनी रंगरंगोटीला सुरुवात केली आहे. आठवडाभरात रंगकाम पूर्ण होऊन मूर्ती विक्रीसाठी बाजारपेठेत येतील. अनेक मंडळांनी मूर्तीची बुकिंग केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गणेशमूर्ती तयार करण्याच्या साहित्यात झालेली वाढ, वाढती महागाई, पाऊस नसल्यामुळे दुष्काळजन्य स्थिती यामुळे या गणेशोत्सवावर महागाई, दुष्काळाचे सावट आहे. असे असले तरी वर्षाचा उत्सव असल्यामुळे युवक वर्ग उत्सवासाठी समिती गठित करणे, श्री स्थापनेसाठी स्टेज, आरासचे नियोजन करीत आहेत.

समिती स्थापन करण्याची लगबग

शहरात गल्लोगल्ली व नवीन वसाहतीत गणेशोत्सवासाठी समिती स्थापन करण्यात येत आहे. येथील रामस्वामी मठात सार्वजनिक गणेशोत्सोव व शिवजयंती समिती कार्यकारिणी समिती गठीत करण्यात आली.

यात अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष महेंद्र पाटील, सचिव नीलेश महाजन, सदस्य नीलेश पाटील, गोपाल भोई, विनोद पाटील, राहुल महाजन, संजय पाटील, नीलेश बारी, डी. डी. वाणी, लिलाधर गजेश्वर, सुरेश शिंदे, भास्कर महाजन यांची निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

Kolhapur circuit bench: १० वर्षांहून अधिक खुर्चीला चिकटून बसलेले संचालक जाणार घरी! २६ बँकांमधील संचालकांनी भितीने घेतली सर्किट बेंचमध्ये धाव

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

Cricket Record: सचिन तेंडुलकर, विराट कोहली, पाँटिंगलाही न जमलेला विश्वविक्रम विंडिजच्या होपने करून दाखवला; धोनीशीही बरोबरी

Diamond Found 300 kg : अन्नाला महाग असलेल्या देशात सापडला ३०० किलोचा हिरा, राष्ट्रपतींचा तातडीचा निर्णय चर्चेत

SCROLL FOR NEXT