Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News: मनोज जरांगे पाटीलांच्या सभांमध्ये पाकीट मारणाऱ्या टोळीला अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या सभा सुरू आहेत. सभांमधून पाकीट-मोबाईलची चोरी मालेगावची टोळी करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने पाच संशयितांना अटक केली. त्यात अबू-बकर ऊर्फ कबुतर (वय ३५) या टोळी प्रमुखासह त्याच्या चार साथीदारांचा समावेश आहे.

मौजे कुऱ्हा पानाचे (ता. भुसावळ) गावच्या बसथांबा चौकात श्री. जरांगे-पाटील यांचा सत्कार सोमवारी (ता. ४) करण्यात आला. (gang of thief in manoj jarange patil sabha arrested jalgaon crime news)

दुपारी साडेबाराच्या सुमारास राजू रुपचंद चौधरी यांच्या खिशातील पाकीट चोरीला गेले. साडेपंधरा हजार रुपयांची रोकड पाच तरुणांनी बळजबरीने काढून घेत त्यांना मारहाण केली आणि धमकी देत पिटाळून लावले.

त्या अनोळखी पाच जणांनी सत्कारावेळी दुसऱ्या एकाच्या खिशातून ६६ हजार रुपयांची चोरी केली. राजू चौधरी यांच्या तक्रारीवरून भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गर्दीत पाकीट, मोबाईल चोरीसह काहींना मारहाण करत लूटमार केल्याची कबुली अटकेतील संशयितांनी पोलिस तपासात दिली आहे.

कार्यकर्त्यांच्या वेशात चोरटे

श्री. जरांगे-पाटील यांच्या सभा-मेळाव्यांसाठी मोठी गर्दी होते. मालेगावच्या कबुतर टोळीने अशा ठिकाणी चोऱ्यांचा सपाटा लावला होता. पांढरा शर्ट आणि जीन पँट अशा वेशभूषेत कार्यकर्त्यांचा आव आणला जात होता.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशन नजन पाटील यांच्या पथकाने पोलिसी खाक्या दाखवताच अबू-बकरने आपल्या चार साथीदारांसह मुक्ताईनगर ते पारोळादरम्यान प्रत्येक गाव, तालुक्यात पाकीटमारी केल्याचे सांगितले. जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात गुन्हे केल्याची माहिती गुन्हे शाखेकडे प्राप्त झाली आहे. इतर जिल्‍ह्यातील पोलिसांशी संपर्क करून माहिती घेतली जात असल्याचे जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी 25,100च्या वर, कोणते शेअर्स वाढले?

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांचा एक शिलेदार गेला, त्यांनी दोन गळाला लावले; गोकुळच्या माजी अध्यक्षांसह एका नगराध्यक्षाचाही प्रवेश निश्चीत

Latest Marathi News Live Update : आमदार बापू पठारे धक्काबुक्कीप्रकरणी बंडू खांदवेसह २० जणांवर गुन्हा दाखल

Marathwada Farmer : नऊ महिन्यांत ७८१ शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; मराठवाडा पुन्हा अश्रूंमध्ये भिजला, सरकार वेळीच दखल घेणार का?

Viral News: साहेब मला वाचवा ! बायको रात्री नागिन बनते अन्... घाबरलेल्या नवऱ्याच्या विनंतीने अधिकाऱ्यासह सगळेच चक्रावले

SCROLL FOR NEXT