Gang sexual assault on prisoner in barracks Jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : बॅरेकमधील कैद्यावर सामूहिक अत्याचार; नकार दिल्याने गळा कापण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शिवाजीनगर परिसरातील रहिवासी तरुण जिल्‍हा कारागृहात न्यायबंदी आहे. बॅरेक-२ मध्ये त्याच्यावर इतर बंदिवान कैद्यांकडून सामूहिक अत्याचार होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

अनैसर्गिक संबंधास नकार दिल्याने पीडित कैद्याचा गळा चिरण्याचा प्रयत्न झाल्याने हा गंभीर प्रकार उजेडात आला.

जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध मंगळवारी (ता. २५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Gang sexual assault on prisoner in barracks Jalgaon Crime News)

जिल्‍हा पेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात नमूद केल्याप्रमाणे जळगाव जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिवाजीनगरातील २६ वर्षीय संशयित आरोपीस भावेश कांतिलाल दंडगव्हाळ, विकी शिंदे, कलीम शेख सलीम, विजय ऊर्फ राणा दिलीप चव्हाण अशा चौघांनी बळजबरीने स्नानगृहात घेऊन जात त्याच्यावर एकामागून एकाने अनैसर्गिक अत्याचार केला.

त्यानंतर सलग प्रत्येक दिवशी पीडिताचे शोषण करण्यात येत होते. पीडित तरुण बॅरेक-२ मध्ये झोपलेला असताना विकी शिंदे याने त्याच्यावर बळजबरी करून अनैसर्गिक कृत्याची मागणी केली. मात्र, पीडिताने नकार दिल्याने त्यास बेदम मारहाण करून त्याच्या गळ्यावर लोखंडी शस्‍त्राने वार करून गळा चिरण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच, जीवे ठार करू, अशा पद्धतीने धमकावण्यात आले असून, तेव्हापासून पीडित तरुण भेदरलेला आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले असून, पीडिताच्या तक्रारीवरून भावेश दंडगव्हाळ, विकी शिंदे, कलीम शेख सलीम, विजय ऊर्फ राणा दिलीप चव्हाण या चौघांविरुद्ध जिल्‍हा पेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे तपास करीत आहेत.

"कारागृहात अतिरिक्त गर्दीमुळे असंख्य अडचणी येतात. पीडित तरुणाने लेखी तक्रार अर्ज दिला असून, तो जिल्‍हा न्यायालयात सादर करून घडला प्रकार कारागृह प्रशासनाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला आहे. कारागृहातील प्रत्येक बॅरेकवर लक्ष ठेवण्याच्या सूचना सुरक्षाधिकारी पाटली यांच्यासह कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. कैद्यांची कौन्सिलिंगही करण्यात येत आहे." - अनिल वाडेकर, कारागृह अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT