Garlic and other vegetables sold by vendors in the market.  
जळगाव

Jalgaon News: भाव वधारल्याने लसणाविना भाजीला फोडणी; चंपाषष्ठीमुळे वांग्यांना मागणी

संजय पाटील

Jalgaon News: बाजारपेठेत लसणाची आवक कमी झाली आहे. तसेच मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लसणाचे भाव वाढले असून, गृहिणींना आता लसणाविना भाजीला फोडणी द्यावी लागणार आहे. दरम्यान, सोमवारी चंपाषष्ठी असल्याने साठ रुपये किलो दराने विकले जाणारे भरिताचे वांगे रविवारपर्यंत शंभरी गाठण्याची शक्यता भाजीपाला विक्रेत्यांनी व्यक्त केली.

मागील आठवड्यात अवकाळी पावसामुळे लसणाच्या आवकेवर परिणाम झाला. बाहेरगाहून येणारा लसणाची पारोळा बाजारपेठेत आवक कमी झाल्यामुळे १०० रुपये किलो दराने मिळणारा लसूण आता २४० रुपये किलो दराने विकला जात आहे. (Garlic prices increased due to heavy rains jalgaon news)

दरम्यान, रोजच्या जेवणात प्रत्येक भाजीत लसूण असल्याशिवाय चव येत नाही. मात्र लसूण महागल्याने गृहिणींचा हिरमोड झाला असून, भाजीत लसूण हा कमी प्रमाणात अथवा नसून विना भाजीला फोडणी दिली जात असल्याचे महिला वर्गांनी बोलून दाखविले. सध्या स्थितीत भाजीपाल्याचे दर समाधानकारक मानले जाते. सकाळी धुरडीचे प्रमाण वाढल्यामुळे भाजीपाला विक्री तेजीत दिसून येते.

दरम्यान, आजचे भाजीपाल्याचे दर असे : लसूण- २४० रुपये किलो, भरीत वांगे ६० रुपये, कांद्याची पात ६० रुपये, वाटाणा ४० रुपये, फुलकोबी ६० रुपये, पत्ता कोबी ३० रुपये, टमाटे २० रुपये, शेवगा १०० रुपये या प्रमाणे विकला जात आहे. दरम्यान, लसणाची आवक वाढून त्याचे दर कमी व्हावे, अशी अपेक्षा महिलावर्ग यांनी व्यक्त केली आहे.

कोथिंबीर व मेथी भाजी वाट्यावर

हिवाळ्यात मेथीच्या भाजीची आवक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे भावही स्थिर असतात. चाळीस रुपये किलो दराने विकली जाणारी मेथी आज दहा रुपये वाट्यावर तर मागील दोन महिन्यात दीडशे रुपये पार करणारी कोथिंबीर दहा रुपये जुडीने बाजारात विकली जात आहे.

चंपाषष्ठी वांगी महागणार

खानदेशात कुलदैवत खंडेराव महाराजांची तळी भरण्याचा व भंडारा उधळण्याचा कार्यक्रम दरवर्षी चंपाषष्ठीला केला जातो. या वेळी सामूहिकपणे खंडेरावाचा उदो उदो करत भरीत व भाकर याचा नैवेद्य प्रसाद म्हणून खाऊन खंडेराव चरणी नतमस्तक होत सर्वांना आयुष्य चांगले जगू दे अशी प्रार्थना केली जाते.

दरम्यान, चंपाषष्ठी संपल्यानंतर वांगी खाण्यास सुरुवात होते. पारोळा शहराचा आठवडे बाजार रविवारी असतो. साठ रुपये किलो दराने विकली जाणारी भरिताची वांगी येत्या रविवारपर्यंत शंभरी गाठणार असल्याचा अंदाज भाजीपाला विक्रेते गोपाल महाजन यांनी व्यक्त केला आहे.

"प्रत्येक भाजी ही लसणाविना होणे शक्य नाही. मात्र चव यावी यासाठी लसणाचा दर वाढल्यामुळे अल्प प्रमाणात वापर सुरू आहे. भाजीपालासह लसणाचे दर कमी व्हावे, हीच अपेक्षा." - आशा पाटील, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT