garbage dumping sakal
जळगाव

Jalgaon News : जळगावातील कचऱ्यावर होणार आता गॅस निर्मिती; बीपीसीएल कंपनीचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरात रोज ७० टन कचरा जमा होतो. आव्हाणी शिवारातील डंपीग ग्राउंडवर त्याचे विलगीकरण करण्यात येते. मात्र, आता याच कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सीएनजी गॅस निर्मिती करण्याचा प्रस्ताव बीपीसीएल कंपनीने महापालिकेला दिला आहे.

महापालिकेतर्फे त्यावर सकारात्मक विचार सुरू असून, त्यापासून महापालिकेलाही उत्पन्नाचा पाच टक्के हिस्सा मिळणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिली.

महापालिकेतर्फे शहरातून जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रीया करण्याबाबत शासनाकडून महापालिकेला पत्र देण्यात आले होते. (Gas production will now be done on waste of Jalgaon news)

त्यानुसार महापालिकेतर्फे डंपींग ग्राऊंडमधील कचऱ्यावर बायोमायनिंग सुरू करण्यात आले आहे. आता कचऱ्यापासून गॅस निर्मिती करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव बीपीसीएल कंपनीने दिला आहे.

याबाबत माहिती देताना आयुक्त डॉ. गायकवाड यांनी सांगितले, कि ‘बांधा वापरा आणि हस्तातंरीत करा’ या तत्ववावर तब्बल २५ वर्षासाठी हा प्रकल्प उभारला जाईल. यातून सीएनजी गॅसची निर्मिती केली जाईल.

कंपनीतर्फे त्याची विक्री करण्यात येईल. कंपनीला होणाऱ्या नफ्यात पाच टक्के हिस्सा महापालिका मागणी करणार आहे. जळगाव शहरातून रोज सुमारे ३०० मेट्रीक टन कचरा गोळा केला जातो.

हा कचरा आव्हाणी शिवारातील कचरा डंपींग ग्राऊंडमध्ये वर्षानुवर्ष साठवला जात आहे. सध्या या ठिकाणी २ लाख ८० हजार मेट्रीक टन कचरा पडून आहे. त्यापैकी १ लाख ६० हजार मेट्रीक टन कचऱ्यावर बायोमायनिंग केले जात आहे. महापालिकेने कंपनीच्या प्रस्तावाला दोन अटी टाकून प्रकल्प उभारण्यास संमती दर्शवली आहे. संमतीचे पत्र दोन दिवसांत पाठवले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी ! 'शासकीय कर्मचारी, अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतला 'लाडकी बहीण'चा लाभ'; शासनाच्या आदेशाला केराची टाेपली !

Ratnagiri Crime : खेडमध्ये धक्कादायक घरफोडी! ४.३२ लाखांचे सोनं-रोख पळविले; चोरट्यांनी कुलूप तोडत घराला टाकली लुट

Latest Marathi News Live Update : बीडच्या माजलगावमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून दोन गट आमनेसामने

ते दुःख पचवणं फार अवघड गेलं... अश्विनी एकबोटे यांच्या निधनानंतर शरद पोंक्षेंना बसलेला धक्का; कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी जाऊन...

'चहा विकणारा पंतप्रधान होतो...' संकर्षण कऱ्हाडेची कविता चर्चेत, म्हणाला...'चहा...'

SCROLL FOR NEXT