Minister Girish Mahajan while flagging off BJP's Savarkar Gaurav Yatra on Thursday,  esakal
जळगाव

Girish Mahajan News | उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेससोबतची युती तोडावी : गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेससोबत असलेली युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावी, असे आव्हान भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) यांनी दिले. (girish mahajan statement about uddhav thackeray Alliance with Congress should be broken jalgaon news)

भारतीय जनता पक्षातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रा काढण्यात आली आहे.

बळीराम पेठेतील भाजप कार्यालयापासून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरवयात्रेचा प्रारंभ करण्यात आला. प्रदेश संघटक विजय चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेते राजेंद्र घुगे-पाटील, प्रदेश महिला उपाध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भारत माता व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयघोषात यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. गौरवयात्रा ३० मार्च ते ६ एप्रिलदरम्यान काढण्यात येणार आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की यात्रेच्या माध्यमातून वीर सावरकर यांनी केलेले कार्याची ओळख नव्या पिढीला होणार आहे. राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावी.

संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, सचिन पानपाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, सुभाष शौचे, नगरसेवक कैलास सोनवणे, माजी महापौर सदाशिव ढेकळे, जिल्हा महानगराचे पदाधिकारी, मंडलाध्यक्ष, आघाडी अध्यक्ष व युवा मोर्चा, महिला आघाडीचे पदाधिकाऱ्यांसह स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, गौरवयात्रा भाजप जळगाव महानगरातील नऊ मंडल व जळगाव शहरात ६ एप्रिलपर्यंत फिरणार आहे. या यात्रेचा समारोप भाजपच्या स्थापनादिनी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT