Gulabrao Patil esakal
जळगाव

Gulabrao Patil : समाजातील वंचित घटकाला मदतीचा हात द्या - गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी प्रत्येकाने नेहमीच मदतीचा हात दिला पाहिजे. संकटात असलेल्या गरजू व्यक्तीला केलेल्या मदतीमुळेच व्यक्ती मोठा होतो. दिव्यांग सेवा हीच ईश्वरी सेवा असून, सामाजिक कार्याने प्रेरित डॉ. कमलाकर पाटील व माजी उपसभापती शीतलताई पाटील यांनी घेतलेला प्रेरणादायी उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

हेही वाचा: संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

महात्मा गांधी उद्यानात दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. गेल्या महिन्यात झालेल्या दिव्यांग स्वावलंबन शिबिरातील १२० लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व यूडीआयडी कार्डवाटप करण्यात आले. १२० दिव्यांग बांधवांचे विविध शासकीय योजनांचे फॉर्म भरून घेऊन त्यासाठी प्रस्ताव तयार केले.

गेल्या महिन्यात झालेल्या शिबिरातील ७०० विधवा, निराधार, परितक्त्या, वृद्ध लाभार्थ्यांचे बँक पासबुक, आधारकार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे जमा केले आणि पंचायत समिती फंडातून अपंग बचतगटांना अर्थसहाय्यासाठी धनादेशवाटप करण्यात आले. प्रास्ताविकात फुपणीचे माजी सरपंच डॉ. कमलाकर पाटील यांनी दिव्यांग बांधव व वृद्ध नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोचण्यासाठी करीत असलेल्या कार्याची माहिती दिली.

उपशिक्षक संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पंचायत समितीच्या माजी उपसभापती शीतलताई पाटील यांनी मानले. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर संघर्ष यात्रेगीत तयार करून माजी उपसभापती शीतलताई पाटील व त्यांची कन्या दीप्ती पाटील यांनी ‘तू चाल पुढे...’ हे संघर्षगीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

दिव्या पाटील व बेबाताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. उपजिल्हा प्रमुख नाना सोनवणे, युवासेनेचे शिवराज पाटील, रमेशआप्पा पाटील, तुषार महाजन, गजानन सोनवणे, जितेंद्र पाटील, बाजार समितीचे संचालक अनिल भोळे, माजी पंचायत समिती सदस्या जागृती चौधरी, मिलिंद चौधरी, विकास संस्थेचे चेअरमन पंकज पाटील, विनोद टेलर, माजी उपसभापती विजय नारखेडे, स्वप्नील परदेशी, निवृत्त डीवायएसपी पुंडलिक सपकाळे, दिलीप आगीवाल, नीलेश वाघ, दिलीप जगताप यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, महिला व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT