cleanliness  esakal
जळगाव

Cleanliness Drive : महापालिकेतर्फे उद्या गोलाणी संकुल स्वच्छता मोहीम; वॉटरग्रेसच्या कर्मचाऱ्यांकडून सफाई करणार

सकाळ वृत्तसेवा

Cleanliness Drive : महापालिकेतर्फे रविवारी (ता. २४) गोलाणी व्यापारी संकुल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. सफाई मक्तेदार वॉटरग्रेस कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून संपूर्ण परिसर स्वच्छ करून घेण्यात येणार असल्याचे आरोग्याधिकारी उदय पाटील यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. (Golani Complex Cleanliness Campaign tomorrow by Municipal Corporation jalgaon news)

याबाबत दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात त्यांनी म्हटले आहे, की गोलाणी संकुल परिसरातील वॉटरग्रेस कामगारांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. मुख्य स्वच्छता निरीक्षक यांनी आपल्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करून घ्यावी, असे आदेशही देण्यात आले आहेत.

संकुलातीच विंगनिहाय कर्मचारी नियुक्त

महापालिकेचे आरोग्याधिकारी उदय पाटील यांनी गोलाणी संकुलाच्या एकूण असलेल्या चार विंगनिहाय मुख्य स्वच्छता निरीक्षक, मुकादम व कर्मचारी यांची जबाबदारी निश्‍चित केलेली आहे.

सकाळ सातपासून स्वच्छता मोहीम सुरू होणार आहे.

स्वच्छतेचा मोठा ड्राईव्ह

जिल्हाधिकारी रामराजे निबांळकर यांच्याकडे महापालिकेचा अधिभार असताना त्यांनी गोलाणी संकुल स्वच्छतेची मोहीम राबविली होती. त्या वेळी संकुलातून मोठ्या प्रकारे कचरा काढण्यात आला होता. त्याच पद्धतीने स्वच्छतेचा मोठा ड्राईव्ह घेण्यात येणार आहे. यास सफाई कर्मचारी, तसेच कचरा वाहणारे ट्रॅक्टर असा मोठा ताफा सहभागी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महादेव मुंडे हत्या प्रकरणात आज दोघांची नार्को टेस्ट, वाल्मिक कराडच्या घरी होते कामाला; गूढ उलगडणार?

Valentine's Day 2026: व्हॅलेंटाईनला फुलांपेक्षा कंडोमची विक्री जास्त! 'हे' शहर आघाडीवर, भारतात नवा ट्रेंड

Ahilyanagar leopard: घरात घुसला अन् बाथरूममध्ये फसला; भिंगारमधील सौरभनगर परिसरात बिबट्या अखेर जेरबंद, बिबट्या आल्याने पळापळी!

Gold Silver Rate Today : सोने -चांदी दरात घसरण, चांदी तब्बल ५ हजारांनी उतरली तर सोने १२०० रुपयांनी घसरले

मुलुंडमध्ये रस्त्याच्या कामावेळी पुन्हा दुर्घटना, लोखंडी पिलर कारवर कोसळला

SCROLL FOR NEXT