banana esakal
जळगाव

Jalgaon News : ‘केळी’चा ‘शालेय पोषण आहारा’ त समावेश; राज्य शासनाने काढले पत्रक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ‘जिल्ह्याचे मुख्य पीक ‘केळी’ आहे. यामुळे त्याचा शालेय पोषण आहारात समावेश व्हावा, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सतत पाठपुरावा केला होता.

त्यास यश आले असून शासनाने शालेय पोषण आहारात केळीचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे.( government decided to include banana in school nutrition jalgaon news )

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात अंडी, केळीचा समावेश करण्याचा अध्यादेश राज्य शासनाने ७ नोव्हेंबर रोजी काढला आहे. जळगाव जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर राहिला आहे.

परंतु केळीला कायमस्वरूपी हमी भाव मिळण्याची शाश्वती नव्हती. तसेच गारपीट, वादळ अशा स्वरूपाच्या नैसर्गिक संकटांत केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही शेतकरी सोसत आहेत. पोषण आहारामध्ये केळीचा समावेश झाल्याने केळी उत्पादक राज्यातील शासकीय तसेच शासन मान्य शाळामध्ये माध्यान्ह भोजनांतर्गत पोषण आहार देण्यात येत आहे.

यात नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नियमित पोषण आहार व्यतिरिक्त अतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यानुसार विद्यार्थ्यांना अंडी देण्यात येणार आहेत. तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत.

त्यांना केळी अथवा स्थानिक बाजारपेठे उपलब्ध असणारे फळ देण्यात यावेत असे आदेशात नमुद करण्यात आले आहे. भारतीय किसान संघानेही पोषण आहारात केळीचा समावेश करण्याची मागणी केली होती.

शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे. जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी केळीचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यासंदर्भात प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. त्याला शासनाने मान्यता दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT