जळगाव

ग्रामपंचायत निवडणूक: जिल्हयात १९ हजार ९८३ अर्ज वैध

देविदास वाणी

जळगाव ः जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रियेत काल रात्री उशिरापर्यंत अर्जांची छाननी सुरू होती. त्यात १९ हजार ९८३ अर्ज वैध तर २८८ अर्ज अवैध ठरले. आता लक्ष उमेदवारी माघारीकडे लागले आहे. चार जानेवारीस अर्ज माघारीची शेवटची तारीख आहे. त्या किती उमेदवार माघारी घेतात, किती बिनविरोध होतात याकडे उमेदवारांसह नागरिकांचे लक्ष लागून आहे. 

जिल्ह्यात ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. ३० डिसेंबरपर्यंत ७ हजार २१३ जागांसाठी एकूण २० हजार २७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यांची छाननीची प्रक्रिया काल झाली. त्यात काही उमेदवारांच्या अर्जावर अनेकांनी हरकती घेतल्याने छाननी दरम्यान वैध, अवैध अर्जांची संख्या सर्वच तहसिल कार्यालयातून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली नव्हती. ती आज प्राप्त झाली आहे. 

त्यात २० हजार २७१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील १९ हजार ९८३ अर्ज वैध, तर २८८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. 

राजकीय डावपेच सुरू
निवडणूकीत कोणत्या नेत्याला बोलावयाचे, अधिकाधिक मते आपल्याच पॅनलला मिळण्यासाठी डावपेच कसे आखायचे, याचे नियोजन आता सुरू झाले आहे. आपल्या विजयासाठी कोणाला माघारी घ्यावयास लावायची, त्याने माघार घेतली नाहीतर इतर काय पर्याय आहेत याचाही शोध सुरू झाला आहे. 

तालुकानिहाय वैध अवैध उमेदवारी अर्जांची संख्या अशी 
तालुका--वैध--अवैध 
जळगाव--१५३०--१५ 
जामनेर- २०२४--३० 
धरणगाव- ११२१--२९ 
एरंडोल- ८३९--२४ 
पारोळा-१४५८--२० 
भुसावळ-८४४--८ 
मुक्ताईनगर-११४५--१० 
बोदवड-६१०--९ 
यावल-१२१९--६ 
रावेर-११५३--३१ 
अमळनेर-१३४८--२९ 
चोपडा-१३२१--८ 
पाचोरा- २३२२--३० 
भडगाव-९४३-७ 
चाळीसगाव-२१०६--३२ 
एकूण--१९९८३--२८८ 


निवडणूक कार्यक्रम 
अर्ज माघारी, चिन्ह वाटप ः ४ जानेवारी २०२१ 
मतदान ः १५ जानेवारी 
मतमोजणी-१८ जानेवारी 

संपादन- भूषण श्रीखंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

Manoj Jarange: उपोषणाला आता अंतरवलीच्या नागरिकांचाच विरोध! जरांगे म्हणतात, आता मन...

SL vs RSA T20 WC 2024 : आफ्रिकेला 77 धावा करताना फुटला घाम; श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलं टेन्शन

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

SCROLL FOR NEXT