जळगाव

पाचोरा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीचा राजकीय धुरळा !

चंद्रकांत चौधरी

पाचोरा : शासनाच्या आदेशानुसार तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून येत्या 15 जानेवारीला ३१७ प्रभागातून ८५८ सदस्य निवडीसाठी राजकीय धुरळा गडद होत आहे. महसूल प्रशासनाच्या वतीने मतदान व मतमोजणीच्या नियोजनासाठी अधिकाऱ्यांची तर कागदपत्रे जमवून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग आहे. 


पाचोरा तालुक्यात १२९ गावे असून १०० ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ९६ ग्रामपंचायतीसाठी ३५३ केंद्रातून येत्या १५ जानेवारीला मतदान होत असून १८ ला मतमोजणी होणार आहे. सरपंच पदासाठी जाहीर करण्यात आलेले आरक्षण रद्द करून निवडणुकीनंतर सरपंच आरक्षण काढण्याचे धोरण शासनाने जाहीर केल्यामुळे अनेकांची गोची झाली आहे. सरपंच निश्चित नसल्याने पॅनल गठीत करणे व एकूणच संघटितपणे खर्च व नियोजन करणे यात, अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या निवडणुकीत कोण कशा पद्धतीने कोणाशी हातमिळवणी करून बाजी मारतो, याबाबतची आकडेमोड करणे सुरू झाले आहे. 
९६ ग्रामपंचायतींच्या ३१७ प्रभागातून एकूण ८५८ सदस्य निवडीसाठी ही निवडणूक होत आहे. कमीत कमी ३ प्रभाग व ७ सदस्यांपासून ते जास्तीत-जास्त ६ प्रभाग व १७ सदस्य या ग्रा.पं.मध्ये आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक ९६ ग्रामपंचायती पाचोरा तालुक्यात असल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष तालुक्याकडे लागून आहे. त्यानुषंगाने प्रशासन, इच्छुक उमेदवार तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची लगबग वाढली आहे. 

तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय 
प्रभाग व सदस्य संख्या याप्रमाणे 

(गावांचे नाव, प्रभाग संख्या व कंसात सदस्य संख्या) 

आखतवाडे ३ (९), अंतुर्ली बु प्र. पा. ३ (७), अंतुर्ली खुर्द प्र.लो. ३ (९), अंतुर्ली खुर्द प्र.पा. ३ (७), आसनखेडे बुद्रुक ३ (९), अटलगव्हाण ३ (७), बदरखे ३ (७), बाळद बुद्रुक ४ (११), बांबरुड प्र. बो. ५ (१५), बांबरुड प्र.पा. ३ (९), भातखंडे खुर्द ३ (७), भोजे ३ (९), भोकरी ५ (१३), भोरटेक खुर्द ३ (७), बिल्दी बुद्रुक ३ (७), चिंचखेडा खुर्द ३ (७), चिंचपुरे ३ (९), दहिगाव ३ (९), डांभुर्णी ३ (७), डोकलखेडा ३ (७), दिघी ३ (७), डोंगरगाव ३ (७), दुसखेडे ३ (९), गाळण बुद्रुक ३ (९), घुसर्डी बुद्रुक ३ (७), गोराडखेडा बुद्रुक ३ (९), गोराडखेडा खुर्द ३ (७), हनुमानवाडी ३ (७), होळ ३ (७), जारगाव ४ (११), कळमसरा ५ (१३), कासमपुरा ३ (९), खडकदेवळा बुद्रुक ३ (९), खडकदेवळा खुर्द ३ (९), खाजोळा ३ (७), नंदीचे खेडगाव ३ (९), कोल्हे ३ (७), कुरंगी ४ (११), कुऱ्हाड बुद्रुक ३ (९), कुर्‍हाड खुर्द ५ (१३), लासगाव ३ (९), लासुरे ३ (७), लोहारा ६ (१७), लोहारी बुद्रुक ५ (१३), लोहटार ४ (११), माहिजी ३ (९), म्हसास ३ (९), मोहाडी ३ (७), मोंढाळे ३ (९), नाचणखेडा ३ (९), नगरदेवळा बुद्रुक ६ (१७), नाईकनगर ३ (७), नांद्रा ४ (११), नेरी ३ (९), निंभोरी बुद्रुक ३ (९), निपाणे ३ (९), ओझर ३ (७), पहाण ३ (९), परधाडे ३ (७), पिंपळगाव हरेश्वर ६ (१७), पिंपळगाव खुर्द प्र.भ. ३ (७), पिंप्री बुद्रुक प्र.भ. ३ (९), पिंप्री बुद्रुक प्र. पा. ३ (७), पिंप्री खुर्द प्र.भ. ३ (९), पुनगाव ४ (११), राजुरी बुद्रुक ३ (७), रामेश्वर ३ (७), साजगाव ३ (७), सामनेर ४ (११), सांगवी प्र.लो. ३ (७), सारोळा बुद्रुक ३ (७), सारोळा खुर्द ३ (७), सार्वे बुद्रुक प्र.भ. ३ (९), सार्वे बुद्रुक प्र.लो. ३ (७), सातगाव डोंगरी ५ (१३), सावखेडा बुद्रुक ३ (७), सावखेडा खुर्द ३ (७), शहापूरा ३ (७), शेवाळे ३ (९), शिंदाड ३ (१५), टाकळी बुद्रुक ३ (७), तारखेडा बुद्रुक ३ (९), तारखेडा खुर्द ३ (९), वडगाव बुद्रुक प्र. पा. ३ (७), वडगाव खुर्द प्र.भ. ३ (७), वडगाव खुर्द प्र. पा. ३ (७), वडगाव मुलाणे ३ (९), वडगाव कडे ३ (७), वाणेगाव ३ (७), वरसाडे प्र. 
बो. ३ (७), वरसाडे प्र. पा. ३ (९), वरखेडी बुद्रुक ४ (११), वेरुळी बुद्रुक ३ (७), वेरुळी खुर्द ३ (७), वाडी ३ (७), वाघुलखेडा ३ (७). 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Mumbai Crime : मोबाईलवर गेम खेळताना पाहून संतापला पिता, चार वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या अन्...

Pune News : देशी गोवंश संवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT