जळगाव

सरपंच, उमेदवार फिक्स नाही; तर खर्च कुणी करायचा ? 

डॉ. गजानन जाधव

तळेगाव (ता. जामनेर)  : तळेगावसह जामनेर तालुक्यात ७३, तर जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या​ निवडणुका १५ जानेवारीला होणार आहेत. त्यामुळे गावागावांतला नूर पालटला आहे.

यापूर्वी प्रत्येक वेळी निवडणुकीसाठी पॅनलप्रमुखांकडून सर्व यंत्रणा राबविली जात असे. उमेदवारांच्या उमेदवारी खर्चापासून ते प्रचार यंत्रणेपर्यंतचा खर्च उचलला जायचा. मात्र, यंदा सरपंचपद कोणाकडे जाणार, हे निवडणुकीनंतर कळणार असल्याने खर्च कुणी आणि कोणासाठी करायचा, हा मुद्दा उपस्थित झाला आहे. 

अनेकांचा सरपंच पदावर डोळा

तळेगावसह जामनेर तालुक्यात ७३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच कारभारी कामाला लागले. गावागावांत सरपंच पदावर डोळा ठेवून अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती.

पॅनलचा खर्च कुणी करावा 

मात्र, या आनंदावर राज्य सरकारच्या परिपत्रकाने पाणी फिरवले. कारण सरपंचपदाचे आरक्षण ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर जाहीर होणार आहे. त्यामुळे गावातील पॅनलचा खर्च कुणी करायचा, असा प्रश्न गावपुढाऱ्यांसमोर आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: रॉकेल मिळणार; पण ‘स्टोव्ह’ कुठून आणणार?; अनेक कुटुंबांचा प्रश्न ः एकच सिलिंडर असलेल्या गृहिणींपुढे अडचणींचा भडका

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर ‘ईव्ही हब’ बनणार; अतुल सावे : मराठवाड्याच्या विकासावर परिषदेत मंथन

IPL 2026: RCB घरच्या मैदानात SRH ला भिडणार, पण पहिल्याच सामन्याला हुकमी एक्के मुकणार; जाणून घ्या संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update : रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार

SCROLL FOR NEXT