Girish Mahajan  sakal
जळगाव

Gram Panchayat Result: मंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात धक्‍का

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान पार पडलं. या ग्रामपंचायतींचा आज (ता. 20) निकाल आहे. यात जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या मोहाडी ग्रामपंचायतीच्या निकालावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते.

या ठिकाणी निवडणुकीत गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील यांनी लढत दिली. या लढतीत त्यांचा विजय झाला आहे, मात्र मंत्री गिरीश महाजन यांचा मतदार संघ अन् बालेकिल्ला असणाऱ्या या परिसरात महाजन यांना मोठा धक्का बसला आहे.

(Gram Panchayat Election Results 2022)

मंत्री गिरीश महाजन यांचा मतदार संघ असलेल्‍या जामनेर तालुक्‍यातील ग्रामपंचायतींकडे विशेष लक्ष होते. मुख्‍य म्‍हणजे या निवडणुकीत गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील यांच्‍या निकालाकडे लक्ष लागले होते. यात भाविनी पाटील यांनी विजय मिळविला आहे.

पॅनलला पराभवाचा धक्‍का

भाविनी पाटील यांचा विजय झाला असला तरी मोहाडी ग्रामपंचायतीत त्यांचे ग्रामविकास पॅनल पराभूत झाले आहे. भाविनी पाटील यांच्या पॅनलला भाजप प्रणितच लोकशाही उन्नती पॅनलने पराभवाचा धक्का दिला आहे. गेल्या पाच वर्षात गावाने जी हुकूमशाही पाहिली त्याचा अस्त झाल्याची प्रतिक्रिया लोकशाही उन्नती पॅनलचे प्रमुख शरद पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्णधार पृथ्वी शॉ फेल, महाराष्ट्राच्या संघाला १५४ धावांचा पाठलागही जमेना! SMAT 2025 स्पर्धेत तिसरा पराभव

Crime: एक भीती अन् वडिलांची असहाय्यता... पित्यानं लेकीला अंधाऱ्या खोलीत २० वर्ष कैद केलं, हादरवणारं कारण समोर

Sangli Water Crisis : अशुद्ध पाण्याने किल्लेमच्छिंडगडचे नागरीक त्रस्त; किडनी स्टोनचा धोका वाढतोय!

IndiGo: इंडिगोचं चाललंय काय? 300 पेक्षा जास्त विमानं रद्द; DGCA पासून मंत्रालयापर्यंत बैठकांचा धडाका, आतापर्यंतचे सर्व अपडेट्स

Latest Marathi News Live Update : हिवरखेड प्रा.आ.केंद्रात अवैध गर्भपाताची शक्यता

SCROLL FOR NEXT