Burglary esakal
जळगाव

Jalgaon : किराणा दुकान फोडून रोकड लांबविली

रईस शेख

जळगाव : शिवाजीनगरातील किराणा दुकानाचे शटर वाकवून दुकानातील ड्राव्हरमधून ९० हजारांची रोकड लांबविल्याची (Burglary) घटना उघडकीला आली आहे. याबाबत चोरट्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Grocery store burglarized jalgaon crime news)

शहरातील शिवाजीनगरातील क्रांती चौकात आनंद मदनलाल नागला यांचे मदनलाल पांडुरंग नागला या नावाने किराणा दुकान आहे. शुक्रवारी (ता. १) त्यांनी नेहमीप्रमाणे रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास दुकान बंद करुन ते घरी गेले. शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी ते दुकानावर आले असता, त्यांना दुकानाचे शटर मध्यभागून उचकविलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी तत्काळ दुकानात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना गल्ल्यातून पैसे चोरी झाल्याचे कळताच नागला यांनी शेजारच्यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी काहीच माहीत नसल्याचे सांगताच नागला यांना दुकानात चोरी झाल्याची खात्री झाली.

चोरट्यांनी नागला यांच्या दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले ८५ हजारांची रोख रक्कम व ५ हजारांची चिल्लर असा एकूण ९० हजारांचा मुद्देमाल लांबविल्याचे दिसून आले. नागला यांनी तत्काळ घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर आनंद नागला यांच्या तक्रारीवरून शनिवारी (ता. २) दुपारी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार ! बंगला भाड्याने घेऊन गार्डनमध्ये सुरू केली गांजाची शेती, तरुणाला अटक

Dead Whale Found Are Ware Beach : 20 फूट लांब आणि 10 फूट रुंद! कोकणच्या किनाऱ्यावर महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत; 4 तासांच्या थरारानंतर विल्हेवाट

Latest Marathi News Live Update : उष्माघातापासून वाहनचालकांना दिलासा, उद्यापासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार

Pune Vande Bharat Accident : सिद्धेश्वर, उद्यानसह दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठा फटका! वंदे भारत दुर्घटनेनंतर रेल्वे विस्कळीत, 7 तास उशिरा गाड्या

Insta-Fb New Rules : मृत्यूनंतर तुमचं फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? ‘डिजिटल मृत्युपत्र’ अन् ‘डिजिटल वारसा कायदा’ काय आहे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT