Minister Gulabrao Patil esakal
जळगाव

Guardian Minister Gulabrao Patil : आनंदाचा शिधा पासून लाभार्थी वंचित राहू नये

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांनी आनंदाचा शिधा उपक्रमाचा लाभ घ्यावा. दिवाळी किटपासून कोणीही वंचित राहणार नाही याची जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पाळधी (ता. धरणगाव) येथे आनंदाचा शिधा-दिवाळी किट वितरणाचा प्रारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते.(Guardian Minister Gulabrao Patil Gain distribution diwali kit to ration card holders Jalgaon News)

पाळधी येथील रास्त भाव दुकानदार सोपान पाटील यांच्या दुकानातील लाभार्थ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिवाळी शिधाजिन्नस संच वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी अमन मित्तल अध्यक्षस्थानी होते.

या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, धरणगावत तहसीलदार नितीन देवरे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे व पाळधी येथील रास्त भाव दुकानदार, लाभार्थी उपस्थित होते. जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. तहसीलदार नितीन देवरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT