Gulabrao Patil esakal
जळगाव

Gulabrao Patil News : विमा कंपनी अधिकाऱ्यांना ‘शिंगाडे’ दाखविण्याची वेळ; पालकमंत्री पाटील यांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

Gulabrao Patil News : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे रावेर, यावल, सावदा, चोपडा या परिसरात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्‍यांनी या नुकसानीची माहिती सादर करूनही त्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही.

त्यामुळे आता विमा कंपनी अधिकाऱ्यांना ‘शिंगाडे’ दाखविण्याची वेळ आली आहे. नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्‍यांचा अंत पाहू नका, असा गर्भित इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. (Guardian Minister gulabrao Patil warning to banana insurance company officials jalgaon news)

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी नुकसानीमुळे मेटाकुटीला आला आहे. आसमानी संकटासह सुलतानी संकटांचादेखील शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार पंचनामे पूर्ण करण्याची प्रक्रिया झाली आहे.

विमा कंपन्यांनाही नुकसानीबाबतची माहिती देण्यात आली आहे. मागील आठवड्यात पालकमंत्री पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनासह विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीदेखिल शासनस्तरावर यासंबंधी पाठपुरावा केला होता. बैठकीत पालकमंत्र्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्‍यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते.

तरीदेखिल विमा कंपन्यांकडून अद्यापही नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.

७७ हजार शेतकऱ्यांनी काढला विमा

जिल्ह्यात ८१ हजार ६४२ हेक्टर क्षेत्रासाठी ७७ हजार ९२० शेतकऱ्‍यांनी एआयसी अर्थात अ‍ॅग्रीकल्चरल इंशुरंस कंपनीकडून केळी पिक विमा काढला आहे. हे सर्व शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत.

नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीतही पालकमंत्री पाटील यांनी पडताळणी न करता केळी उत्पादकांना तातडीने मदत करण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीदेखिल विमा कंपन्यांनी याबाबत कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना आता शिंगाडेच दाखविण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy : मोहम्मद शमीने टप्पात कार्यक्रम केला; MS Dhoni चा पठ्ठ्या शतक झळकावून एकटा नडायला गेला, पण...

Latest Marathi News Live Update : इचलकरंजी एसटी आगार मालामाल! दिवाळीत १ कोटी १२ लाख उत्पन्न जमा

Body Impact Less Sleep: तुम्हीही रात्री फक्त 2 तास झोपताय? जाणून घ्या शरीरावर काय परिणाम होतात

Honesty Story : 'ओवीने प्रामाणिकपणे परत केला सुवर्णहार'; खेळताना सापडला पाच तोळे सोन्याचा हार

Electric Shock: सिव्हर टॅंक रिकामे करताना हेल्परचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; तिघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT