Gulabrao Deokar questioned about poetess bahinabai Balkavi Thombare memorial work completion jalgaon news esakal
जळगाव

Gulabrao Deokar : कवयित्री बहिणाबाई, बालकवी ठोंबरेंचे स्मारक 10 वर्षांतही पूर्ण का झाले नाही? : गुलाबराव देवकर

सकाळ वृत्तसेवा

Gulabrao Deokar : कवयित्री बहिणाबाई चौधरी व बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे स्मारक करण्यासाठी आपल्या काळात निधी मंजूर होता, कामही सुरू झाले होते.

परंतु, दहा वर्षांत जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले गुलाबराव पाटील काम पूर्ण करू शकले नाहीत, ही खेदाची बाब आहे. आता तरी लक्ष घालून वर्षभरात हे स्मारक पूर्ण करावे, अशी मागणी माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांनी केली. (Gulabrao Deokar questioned about poetess bahinabai Balkavi Thombare memorial work completion jalgaon news)

आकाशवाणी चौकातील जिल्हा मजूर फेडरेशनच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लीलाधर तायडे, वाल्मीक पाटील, बंडू भोळे उपस्थित होते. देवकर म्हणाले, की बहिणाबाई चौधरी यांच्या असोदा येथील स्मारकासाठी १२ कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केली. आपण त्यांचे स्वागत करतो. परंतु, स्मारक दहा वर्षांतही पूर्ण का झाले नाही? याचे उत्तर देण्याचीही गरज आहे.

१२ कोटी मंजूर; पण नियोजन काय?

राज्याचे ग्रामविकासमंत्री महाजन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक पूर्ण करण्यासाठी १२ कोटी मंजूर झाल्याचे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत सांगितले. या १२ कोटींतून कोणती कामे होणार आहेत, याचे कोणतेही नियोजन दिसत नाही. त्यामुळे आता ही रक्कम स्मारकाच्या कोणत्या कामासाठी खर्च करणार, हे जाहीर करून काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बालकवी ठोंबरे स्मारकही रखडले

धरणगाव येथे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे स्मारक व्हावे, यासाठीही आपण पालकमंत्री असताना निधी मंजूर करून चालना दिली होती. परंतु, गेल्या दहा वर्षांत हे काम रखडले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याकडेच लक्षच दिले नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे आज अर्धवट झालेल्या कामाचा दरवाजाही चोरीला गेला आहे. मंत्री, प्रशासन यांचा उदासीनपणा या ठिकाणी दिसून येतो. या स्मारकासाठीही तातडीने निधी मंजूर करून त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणीही देवकर यांनी केली.

निवडणुकीची घोषणा ठरू नये

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक पूर्ण करण्यासाठी मंत्री महाजन यांनी १२ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. मात्र, त्यातून खऱ्या अर्थाने काम सुरू करावे. निवडणुका जवळ आल्याने स्मारकांची आठवण झाली.

त्यामुळे निधीची घोषणा झाली, असे होऊ नये, असे मत व्यक्त करून देवकर म्हणाले, की दोन्ही स्मारकांसाठी खासदार, पालकमंत्री व विद्यमान आमदारांचे प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, यात यांचे कोणतेही श्रेय नसून, खऱ्या अर्थाने आपलेच प्रयत्न आहेत, असा दावा देवकर यांनी या वेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honey Trap Miraj : बुलाती है मगर जानेका नहीं! सोशल मीडियाचा नाद लावून पोरं बाद करणारी टोळी, मिरजेत फोटो, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; कोल्हापूर कनेक्शन

Jalna Crime: पोलिस रेकॉर्डवरील एकाचा खून; जालन्यात थरार, जमिनीच्या वादातून चौघांकडून सशस्त्र हल्ला

नेते अन्‌ कार्यकर्त्यांनो सावधान ! 'साेलापुरात बाईक रॅली काढाल तर गुन्हा दाखल'; पोलिस आयुक्तांचे काय आहेत नियम?

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित'; शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई मिळेना..

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

SCROLL FOR NEXT