Gulabrao Patil esakal
जळगाव

Gulabrao Patil : जिल्ह्यात 138 संविधान भवन बांधणार : गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोचत असून, ते अधिक प्रभावीपणे पोहोचावेत. (gulabrao patil statement about 138 Constituent Buildings will be constructed in district jalgaon news)

डॉ. बाबासाहेबांचे विचार जनसामान्यांत रूजविण्यासाठी जिल्हाभरात ५५ कोटींच्या निधीतून १३८ संविधान भवन बांधण्यात येणार असून, मागासवर्गीयांच्या विकासासाठी कोणत्याही निधीची कमतरता पडू देणार नाही.

पुस्तक मस्तकात आले पाहिजे, बाबासाहेबांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणून समाज उत्थानाचे काम करावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी (ता. १४) येथे केले. सामाजिक न्याय व व विशेष सहाय्य विभागाच्या उपक्रमांत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर येथील व्याख्याते डॉ. वासुदेव मुलाटे उपस्थित होते.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत १ एप्रिल ते १ मेदरम्यान राज्यभरात ‘सामाजिक न्याय पर्व २०२३’ विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण कार्यालयातर्फे जिल्हा नियोजन भवनात कार्यक्रम झाला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या सदस्या शामिभा पाटील, प्राचार्य डॉ. राकेश चौधरी, सचिन पवार, रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्र प्रदर्शन भरविले होते. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो (जळगाव)तर्फे चित्रप्रदर्शन भरविले होते. या चित्रप्रदर्शनाची पाहणी पालकमंत्री पाटील यांनी केली.

प्रमुख वक्ते डॉ. मुलाटे म्हणाले, की कुठलेही महापुरुष कोणत्याही जाती धर्माचे नसतात, तर ते एकाच जातीचे असतात. ते म्हणजे माणूस. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न विचारण्याचे सामर्थ्य समाजामध्ये निर्माण केले. मनीषा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र कांबळे यांनी आभार मानले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

विविध योजनांचे बक्षीसवाटप, स्वाधार शिष्यवृत्तीचे वाटप, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार शिष्यवृत्ती, जात प्रमाणपत्रवाटप, कन्यादान योजना, तसेच कला व क्रीडा क्षेत्रांतील स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री पाटील व मान्यवरांच्या हस्ते बक्षीसवाटप करून गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT