Gulabrao Patil esakal
जळगाव

Gulabrao Patil : ‘राष्ट्रवादी’पाठोपाठ आता ‘काँग्रेस’चे आमदारही फुटणार; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा दावा

सकाळ वृत्तसेवा

Gulabrao Patil : राष्ट्रवादी कॉंग्रेसपाठोपाठ आता काँग्रेसचे आमदारही फुटणार असल्याचा खळबळजनक दावा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शनिवारी (ता. ८) येथे पत्रकारांशी बोलताना केला.

त्यांच्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (gulabrao patil statement After NCP Congress MLAs will split jalgaon news)

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आमदार फुटून भारतीय जनता पक्ष- शिंदे गटाच्या सत्तेत सहभागी झाले आहेत. आणखी कोणी येण्याची शक्यता आहे का? या प्रश्‍नाला उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले, की आता काँग्रेसचे आमदार फुटतील. ते कुणाकडे येतील, ते सांगता येणार नाही.

पवारांविषयीचा अंदाज खरा ठरला

अजित पवार भाजपसोबत येतील, याबाबत कल्पना होती का? यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की कुणालाच कल्पना नव्हती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, दोन महिन्यांपूर्वीच मी सांगितलेला अंदाज खरा ठरला, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. ते येतील, याबाबत मला कुठलीही माहिती नव्हती, असेही गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचेही आमदार तयारीत आहेत, सांगता येत नाही. कोणाकडे येतील ते सांगता येणार नाही, पण येतील. ते येतील, हे मी निश्चितपणाने ऐकले आहे, असा दावा मंत्री पाटील यांनी केला. यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी कोणता ट्विस्ट येतो, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News : भीषण अपघात ! म्हशीला वाचवताना ४ वाहनांची धडक; ४ ठार, अनेक जखमी

Panchang 12 October 2025: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्र पठण व ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

३७ वर्षांच्या संसारात कधीही अशोक सराफ 'ही' गोष्ट निवेदितांसमोर बोलले नाहीत; म्हणाल्या, 'नंतर त्याला विचारल्यावर...'

Latest Marathi News Live Update : शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात काम केल्याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांची कबुली; शहाजी पाटीलांचा पलटवार

CM Yogi Adityanath : सीएम योगींच्या 'स्वदेशी अभियाना'ला नवी भरारी; 'स्वदेशी मेळ्यां'मुळे कारागिरांची दिवाळी होणार समृद्ध!

SCROLL FOR NEXT