Guru Purnima 2023 esakal
जळगाव

Guru Purnima 2023 : "गुरूर्ब्रह्म गुरूर्विष्णु: गुरूर्देवो महेश्वर:"... आई वडील हेच पहिले गुरू!

सकाळ वृत्तसेवा

Guru Purnima 2023 : गुरूर्ब्रह्म गुरूर्विष्णु: गुरूर्देवो महेश्वर:

गुरू: साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरूवे नमः

या उक्तीप्रमाणे गुरू तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात. आपल्या जीवनातील अंधार ते आपल्या ज्ञानाद्वारे दूर करतात. आपल्या संस्कृतीत गुरूचे स्थान अतिउच्च आहे.

गुरूंचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे. आपले प्रथम गुरू आपले आई वडील असतात. शालेय जीवनात आपले गुरूच आपल्या प्रगतीसाठी नवनवीन ज्ञान देतात, अशा भावना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केला. (Guru Purnima 2023 Parents are first Guru jalgaon news)

वडिलांनी दिली प्रेरणा

डॉ. गिरीश ठाकूर (डीन, जिल्हा शासकीय रुग्णालय व महाविद्यालय) : आम्ही मुळ विदर्भातील. वडील शेतमजुरी करायचे. वडिलांचे बंधू, बहिणी मिळून मोठे कुटुंब होते. वडील मोठे असल्याने सर्व बंधू-भगिनीची जबाबदारी वडिलांवर होती. वडिलांनी मेहनतीने सर्वांचे पालनपोषण केले. वडील जुनी दहावी पास होछन नंतर ‘डीएचपी’ कोर्स करून डॉक्टर झाले.

शेतीही त्यांनी केली. मी लहान असल्याने डॉक्टर व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा होती. मलाही विज्ञानाची आवड असल्याने मी मेडीकलकडे वळलो. आईवडिलांनी दिलेले प्रोत्साहन, आत्मविश्वास, सततच्या पाठिंब्यामुळे मी डॉक्टर झालो. लातूर, अलीबाग, नंदुरबार या ठिकाणी डीन होतो. आता जळगावला आहे. आईवडिलांनी दिशा दिली. यामुळे या पदापर्यंत पोचलो आहे.

परोपकार, इतरांना मदतीची शिकवण

डॉ. अभिजित अहिरे (प्रभारी डीन, जिल्हा शासकीय आयुर्वेदीक रुग्णालय व महाविद्यालय) : आम्ही मुळचे मालेगाव तालुक्यातील. वडील नोकरीला परभणीला होते. यामुळे माझे शिक्षण परभणीला झाले. मी वर्गात स्कालर मुलगा होतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरवर्षी पहिला यायचो. यामुळे मी डॉक्टर व्हावे, अशी वडीलांची इच्छा होती. आईचीही तीच इच्छा होती. आईवडिलांकडून ‘मला परोपकार करा, इतरांना मदत करा, कोणाच्या कोणत्याही अडीअडचणीला धावून जा’, अशी शिकविण मिळाली. याचा उपयोग मी दैनंदिन जीवनात करीत आहे. आई वडील हेच पहिले गुरू आहेत.

आईवडिलांकडून अभ्यासाचा पाया पक्का

रवींद्र भारदे (निवासी उपजिल्हाधिकारी) : माझे वडील शेवगाव (जि. अहमदनगर) शाळेचे मुख्याध्यापक होते. शेवगावच्या बाळासाहेब भारदे इंग्लिश मीडियम स्कूलचे ते अध्यक्ष आहेत. आई त्याच शाळेत ग्रंथपाल होती. वडील मुख्याध्यापक असल्याने त्यांनी संस्कृत, मराठी विषयाची गोडी लावली. आईने गणित, सायन्स विषयाची आवड लावली.

यामुळे माझा अभ्यासाचा पाया पक्का झाला. मी मोठेपणी काय व्हावयाचे, हे माझ्यावर टाकले होते. मी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. आईवडिलांची शिकवण व पाठिंब्यामुळे मी आजपर्यंत मजल मारली. तेच माझे पहिले गुरू आहेत.

माझी आईच माझी गुरू

स्‍नेहा कुडचे (उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद) : माझ्या आईला नेहमी असे वाटायचे, की मी वेगळी ओळख निर्माण करायला हवी. ‘एमपीएससी’बद्दल काहीच माहीत नव्हते. तरीही शासकीय अधिकारी बनविण्यासाठी किंबहुना पद मिळण्यासाठी तिचा खूप मोठा सकारात्मक पाठिंबा मला मिळाला.

यश व अपयश कसे हाताळावे, सकारात्मकता, कोणत्याही प्रसंगी आपली भूमिका, विषयाप्रती, दृष्टिकोन आणि सचोटी, महिला म्हणून वर्तन, अशा अनेक जीवनातल्या महत्त्वपूर्ण बाबी मला माझ्या आईकडून मिळाल्या. आजही एखादे संकट आले, की तिने या परिस्थितीत काय निर्णय घेतला असता, हा विचार करूनच मी सकारात्मकरित्या परिस्थितीशी सामोरे जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT