Gutkha worth 57 thousand seized from house of trader Jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : व्यापाऱ्याच्या घरातून 57 हजारांचा गुटखा जप्त

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील पोलिसांनी गोपनीय माहितीवरून पाटीलवाडा परिसरातील व्यापाऱ्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला असता ५७ हजार ६३८ रुपये किमतीचा गुटखा पानमसाल्याचा साठा आढळून आला.

दरम्यान, पोलिसांचा सुगावा लागताच व्यापारी पसार झाला. त्याचा पोलिस शोध घेत आहेत. (Gutkha worth 57 thousand seized from house of trader Jalgaon Crime News)

सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली असता, त्यांनी पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना कारवाईचे आदेश दिले आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर ढिकले, योगेश बेलदार, दिपक पाटील, अमोल भोसले, प्रवीण जाधव, प्रकाश पाटील, शब्बीर शेख यांच्या पथकाने विजय चंद्रकांत देवरे (रा. परिवार कलेक्शनसमोर, पाटीलवाडा, चाळीसगाव) यांच्या निवासस्थानी बुधवारी (ता. १२) छापा टाकला असता विक्रीसाठी आणलेला गुटखा पानमसाला ( किंमत ५७ हजार ६३८ रुपये) आढळला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिसांनी हा माल जप्त केला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलिस अधीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पाटील यांच्या सहकार्याने सहायक पोलिस निरीक्षक ढिकले तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, तो हिंसाचार...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Sourav Ganguly: चांगल्या खेळपट्टीवर खेळा अन् शमी जरा विश्वास ठेवा, गांगुलीने गौतम गंभीर स्पष्ट शब्दात सुनावलं

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

SCROLL FOR NEXT