Gutkha seized by Food and Drug Administration team  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चोपड्यातून दीड लाखांचा गुटखा जप्त; 4 दुकानांना ‘सील’

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरात अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी (ता. ७) सकाळी अकराला वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून १ लाख ६७ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांच्या लेखी तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासनाच्या जळगाव, धुळे व नाशिक येथील पथकांनी ही कारवाई केली.(Gutkha worth one lakh seized from choppda jalgaon crime news)

शहरातील दर्शन पान सेंटर, किशोर चौधरी यांच्याकडे अवैधरित्या गुटखा विक्री करताना १ हजार ९७० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दयानंद अमरलाल सिंधी यांच्या गुरुकृपा प्रोव्हिजन यांच्याकडे ५१ हजार २०७ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धनराज रूपचंद गेही यांच्या महादेव स्वीट यांच्याकडे ५५ हजार ६०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नवल झन्नालाल जैन यांच्या गोदामातून ५८ हजार ४७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आले आहे. तसेच यांच्या गोदामांना व दुकानांना सील करण्यात आले आहे. असा एकूण १ लाख ६७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

नाशिक विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे, नाशिक येथील सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे, जळगाव येथील सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे, धुळे येथील अन्न सुरक्षा अधिकारी के. एच. बाविस्कर, जळगाव येथील अन्न सुरक्षा अधिकारी एस. एम. पवार, नंदुरबार येथील अन्न सुरक्षा अधिकारी बेबी पवार, नाशिक येथील अन्न सुरक्षा अधिकारी जी. व्ही. कासार, नाशिक येथील अन्न सुरक्षा अधिकारी यू. आर. सूर्यवंशी,वाय. आर. देशमुख आदी पथकात सामील होते.

शहरातील मोठी कारवाई

गेल्या आठवड्यात जळगाव येथील दोन अधिकाऱ्यांचे पथक आले होते. तेव्हा केवळ १ हजार ८०० रुपयांचा गुटखा पकडून कारवाई करण्यात आली होती. वास्तविक चोपडा शहरासह तालुक्यात पान सेंटरवर सर्रास अवैध गुटखा विकला जातो. एवढेच नाही तर शहरात गुटखा किंग समजणाऱ्यांकडे लाखो रुपयांचा गुटखा साठा असतो.

परंतु चिरीमिरी करून अवैध गुटखा सर्रास विकला जातो. चोपडा तालुक्यात शेजारी असलेल्या मध्य प्रदेशमधून दररोज लाखो रुपयांचा गुटखा येत असतो. मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे चर्चिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Video : "तुझं तोंड शेणात घाल"; पहिल्याच दिवशी रुचिता-तन्वीमध्ये जुंपली !

Latest Marathi News Live Update : इस्रोचे मिशन अयशस्वी, कक्षेत पोहोचण्यापूर्वीच 'अन्वेषा' अवकाशात गायब

Devendra Fadnavis : 'जो राम का नही, ओ किसी काम का नही'; नाशिकच्या सभेत फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात

Who is Mini Kohli ? विराट कोहलीसारखा दिसणारा 'तो' चिमुकला आहे तरी कोण? रोहितही म्हणालेला, विराट, बघ, तुझा डुप्लिकेट!

Nagpur Crime: नागपूरात ‘न्यूरो ट्रेड’च्या नावाखाली १५.३७ लाखांचा गंडा; व्यावसायिकाची सायबर चोरट्याकडून फसवणूक !

SCROLL FOR NEXT