Haldi kunku esakal
जळगाव

Jalgaon News : विधवा, परितक्त्यांसमवेत हळदी-कुंकू; जुन्या विचारांना तिलांजली!

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : तालुक्यातील खवशी येथे विधवा परितक्त्यासमवेत हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे अध्यक्षस्थानी होत्या. (Haldi Kunku program was organized along with widows jalgaon news)

खवशी ग्रामपंचायतीतर्फे बुधवारी (ता. ८) हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, ॲड. ललिता पाटील, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, ॲड. तिलोत्तमा पाटील, वसुंधरा लांडगे, प्रा.अशोक पवार, गौतम मोरे उपस्थित होते.

या वेळी प्रतिभा शिंदे यांनी स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी लढा उभारण्याचे आवाहन उपस्थितांना केले. स्त्रियांना विधवा न संबोधता एकल महिला संबोधण्याच्या संकल्पनेचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे, तसेच स्त्रिया या परिपूर्ण असून, पुरुषांपेक्षा कुठेच कमी नाहीत, असे सांगितले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या वेळी माजी आमदार स्मिता वाघ, ॲड. ललिता पाटील, ॲड. तिलोत्तमा पाटील, वसुंधरा लांडगे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. अरुण देशमुख यांनी प्रास्ताविक केले. या वेळी गावातील आजी माजी सैनिकांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिजाबराव पाटील, प्रकाश पाटील, प्रकाश पाटील, सुरेश भिल, भालेराव पाटील, कैलास सूर्यवंशी, बी. के. सूर्यवंशी, रोहिदास कापडे, लोटन पाटील, कान्हू कापडे, सूर्यकांत कापडे, भगवान गोसावी, आनंदा गोसावी, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपशिक्षिका पूनम पवार, प्रसाद कापडे यांनी सूत्रसंचालन केले तर बी. के. सूर्यवंशी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT