Harassment of married for 10 lakhs jalgaon crime news
Harassment of married for 10 lakhs jalgaon crime news  sakal
जळगाव

Jalgaon Crime News : विवाहितेला सासरकडुन पैशांसाठी ठार मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील नशिराबाद येथील माहेर असलेल्या विवाहितेचा माहेरहून १० लाख रुपये आणावेत, यासाठी छळ करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बुधवारी (ता. ३) दुपारी एकला पतीसह सासरच्या मंडळींविरोधात नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Harassment of married for 10 lakhs jalgaon crime news)

नशिराबाद येथील माहेर असलेल्या नम्रता दीपक महाजन यांचा विवाह गावातीलच दीपक विठ्ठल महाजन यांच्याशी झाला आहे. लग्नानंतर काही दिवस चांगली वागणूक दिली. त्यानंतर दीपक याने नोकरीसाठी माहेरहून १० लाख रुपये आणावेत, अशी मागणी केली.

दरम्यान, विवाहितेने पैसे आणले नाहीत, म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच सासू, सासरे, ननंद यांनी पैशांसाठी पिळवणूक केली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

बुधवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती दीपक विठ्ठल महाजन, मालती विठ्ठल महाजन, विठ्ठल शंकर महाजन, हेमलता विठ्ठल महाजन, डिंपल विठ्ठल महाजन (सर्व रा. नशिराबाद) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक गजानन देशमुख तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT