Jalgaon Crime News : त्या अनोळखी तरुणाची ओळख पटली

death
death esakal

Jalgaon Crime News : धावत्या रेल्वेतून बुधवारी (ता. ३) अनोळखी तरुण गंभीर जखमी झाला होती. जखमी तरुणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना, त्याचा मृत्यू झाला होता. (unknown dead youth was identified jalgaon crime news)

त्याच्याजवळील मोबार्ईलमधील सीमकार्डवरून त्या तरुणाची ओळख पटली असून, राजाभय्या लालचंद्र रावत (वय २०, रा. राजाखेडा, ता. मौरवा, जि. उन्नाव, उत्तर प्रदेश), असे मृताचे नाव आहे.

उत्तर प्रदेशातील राजाखेडा येथील राजाभय्या रावत हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. कामानिमित्त तो पंढरपूर येथे गेला होता. तेथे हातमजुरी करून तो आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. बुधवारी सकाळी राजाभय्या गावाकडील मित्रांसोबत आपल्या गावी जाण्यासाठी निघाला. रेल्वेत तो दरवाजावळ बसला होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

death
Jalgaon Fraud Crime : बहुराष्ट्रीय कंपनीच्या मालकाला साडेबासष्ट लाखांचा चुना

असोदा रेल्वेगेटजवळ धावत्या रेल्वेतून पडून तो गंभीर जखमी झाला होता. गंभीर अवस्थेत राजाभय्याला तत्काळ काही तरुणांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना, गुरुवारी (ता. ४) सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

त्याच्यावळ असलेला मोबाईलमधील सीमकार्ड पोलिस कर्मचारी वासुदेव मराठे यांनी आपल्या मोबाईलमध्ये टाकले. त्यावर राजाभय्या याच्या भावाचा फोन आल्यामुळे मताची ओळख पटली. त्यानंतर त्याचे कुटुंबीय जळगावला येण्यासाठी निघाले आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्किम मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी वासुदेव मराठे तपास करीत आहे.

death
Jalgaon Crime News : आई-वडिलांना अडकवण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com