Pachora: Rishikesh Maharaj, Balashrikrishna and Talakari while breaking curds in Kaliya Kirtan during Kirtan, Dnyaneswari Parayan and Garuda Purana Week esakal
जळगाव

Jalgaon News : हरिनाम किर्तन, पारायण सप्ताहाची पाचोरा येथे सांगता

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : येथील विवेकानंद नगरातील जगदंबा माता मंदिर संस्थानतर्फे आयोजित अखंड हरिनाम कीर्तन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व गरुड पुराण कथा सप्ताहाची रविवारी (ता. २९) सांगता झाली.

शहरातील विवेकानंद नगरातील जगदंबा माता मंदिराच्या प्रांगणावर २२ ते २९ जानेवारी दरम्यान अखंड हरिनाम कीर्तन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व गरुड पुराण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने दररोज सकाळी पाच ते सहा काकडा भजन, सहा ते सात योग अभ्यास, ८ ते १२ श्री ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी तीन ते पाच गरुड पुराण, सायंकाळी साडेपाच ते साडेसहा हरिपाठ व रात्री साडेआठ ते अकरा हरि कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम झाले. (Harinam Kirtan Parayan Saptah Celebration in Jalgaon Jalgaon News)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

या सप्ताहात अरुण महाराज (जामठी), मच्छिंद्र महाराज (नेवासा), समाधान महाराज (जळगाव), ज्ञानेश्वर महाराज (बेलदारवाडी), रामेश्वर महाराज (भेंडा फॅक्टरी), बबनजी महाराज (बीड), हरीशरण महाराज (वैजापूर) व बालयोगी ऋषिकेश महाराज (श्रीरामपूर) यांचे कीर्तन झाले. व्यासपीठाचे संचलन नारायण महाराज, गोरक्षनाथ महाराज, रामदास महाराज यांनी केले.

बालयोगी ऋषिकेश महाराज यांच्या अमृतवाणीतून गरुड पुराणाचे निरूपण करण्यात आले. रामदास महाराज यांनी योगाभ्यास घेतला. सप्ताह सांगता निमित्ताने काल (ता. २९) ऋषिकेश महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले. रामकृष्ण हरी, कृष्णाच्या जयघोषात चिमुकल्याच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. महाप्रसादाने सांगता झाली. यशस्वितेसाठी जगदंबा माता मंदिर संस्थानचे भक्तगण व सेवेकऱ्यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat News: ताम्हिणी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी! पुणे-कोकण मार्ग बंद करण्याचा निर्णय, वाहनांच्या लांबच लांब रांगा

IND vs SA, 2nd Test: शुभमन गिल खेळला नाही, तर रिषभ पंतच्या नावावर होणार मोठा विक्रम! धोनीनंतर पहिल्यांदाच...

Solapur Election : अर्ज छाननीत पाच तासांचा थरार; कोंडूभैरी आणि कदम यांच्या भूमिकेवर नगराध्यक्ष निवडीचे समीकरण अवलंबून!

Kolhapur News: महायुतीतील मित्रपक्षांत धुसफूस, ‘इनकमिंग’वरून नाराजी; जागा वाटप फॉर्म्युला अनिश्चित

Umarga News : महायुती व महाविकास आघाडीचे आज चित्र स्पष्ट होणार; उमरगा व मुरुम पालिकेतील तडजोडीकडे सर्वांचे लक्ष!

SCROLL FOR NEXT