Hatnur dam 41 doors were opened jalgaon news esakal
जळगाव

Hatnur Dam : ‘हतनूर’चे 41 दरवाजे उघडले; धरणातून 1 लाख 37 हजार क्युसेकने विसर्ग

सकाळ वृत्तसेवा

Hatnur Dam : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने तापी, पूर्णा नदीला पूर आला असून, धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे बुधवारी (ता. १९) सायंकाळी पाचला धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले.

धरणातून सध्या १ लाख ३७ हजार ०९३ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून, तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Hatnur dam 41 doors were opened jalgaon news)

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, पूर्णा व तापी नदीक्षेत्रात सातत्याने चांगला पाऊस होत आहे. मध्य प्रदेश व विदर्भातील पावसामुळे या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तापी व पूर्णा नदीच्या पाणीपातळीत २१०.०५० मीटरने वाढ झाली आहे.

धरणातील एकूण साठा १९८.०० दलघमी असून, प्रवाह वाढल्याने धरण ५१.३ टक्के भरले असून, पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यामुळे सायंकाळी पाचला धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे. त्यातून एक लाख ३७ हजार ९३ क्युसेक्स एवढा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

सतर्कतेचा इशारा

पाण्याचा विसर्ग वाढल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाचे सर्व दरवाजे पूर्ण उघडल्याने नागरिकांनी नदीपात्रालगत जाऊ नये, गुराढोरांनाही त्यापासून दूर ठेवावे, असे आवाहन शाखा अभियंता जी. एस. चौधरी यांच्यासह जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT