International Yoga Day
International Yoga Day esakal
जळगाव

योग दिवस विशेष : बालकांमधील मधुमेह, थायरॉइडवरही ‘योग उपचार'

सचिन जोशी

जळगाव : गेल्या काही वर्षांत बदललेल्या जीवनशैलीने विशेषत: शालेय विद्यार्थ्यांमध्येही मधुमेह, थायरॉइडसारख्या समस्या उद्‌भवू लागल्या. गेल्या दोन वर्षांतील ऑनलाइन शिक्षणाने त्यात भरच घातलीय. मात्र, नियमित योगाभ्यासाने या समस्यांचेही उत्तर मिळत असल्याचे निदर्शनास आलेय.
गेल्या काही वर्षांत प्रत्येकाचीच जीवनशैली बदलली. लहान मुले, महिलाही त्यास अपवाद नाहीत. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंतच्या दिनचर्येतील बदलामुळे प्रत्येकात काही ना काही आरोग्याच्या अथवा मानसिक समस्या उद्‌भवल्याच्या अनेक तक्रारी दररोज समोर येताय आणि ही आता व्यक्तिगत नव्हे तर सार्वत्रिक समस्या म्हणून निर्माण झालीय.

मुलांनाही डायबेटिस

अलीकडच्या काळात तर शालेय विद्यार्थी विविध समस्यांनी पीडित आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सर्वांनीच स्वीकारले. अपरिहार्यता म्हणून ते स्वीकारले असले तरी त्यासोबत विविध शारीरिक समस्याही उद्‌भवू लागल्या. मुलांचा स्क्रीन टाइम (मोबाईल, कॉम्प्युटरवरील वेळ) वाढला. त्यातून डोळ्यांसह डोकेदुखी आणि इतकेच काय तर पाच वर्षांखालील मुलांनाही मधुमेहासह (juvenile diabetic) थायरॉइडचा त्रास असल्याच्या तक्रारी डॉक्टरांकडे वाढू लागल्या आहेत. शिवाय, मुलांचा संयम ढळत असून, ती रागीट, चिडचिडी होत असल्याच्याही पालकांच्या तक्रारी आहेत.

‘योगा’ने दिले उत्तर

मात्र, या समस्यांवरही नियमित योगाभ्यासाने उत्तर दिल्याचे निदर्शनास येत आहे. पाल्यांच्या अशा प्रकारच्या समस्या घेऊन पालक योगशिक्षकांकडे जात असून, नियमित वर्गाने या समस्यांचे प्रमाण कमी होत असल्याचे लक्षात आले आहे.

मणक्यांच्या आजारावरही उत्तर

महिलांमध्येही गेल्या काही वर्षांत मायग्रेन व मणक्यांमधील विकारांचे (सर्व्हायकल स्पाइन) प्रमाण वाढले. त्यावरही योगाभ्यासाने उत्तर शोधले असून, ठराविक योग प्रात्यक्षिक केल्यानंतर या समस्याही दूर होऊ लागल्या आहेत.

अनिता पाटलांनी स्वीकारले आव्हान

अगदीच लहान मुलांमधील अशा प्रकारच्या समस्या एक आव्हानच आहे. विख्यात योगतज्ज्ञ अनिता पाटील यांनी हे आव्हान स्वीकारले आहे. ज्या मुलांमध्ये अशा प्रकारच्या या समस्या आहेत, त्या मुलांवर त्यांचा अभ्यास आणि काम सुरू आहे.

अलीकडच्या काळात लहान मुलांमध्येही मधुमेह, थायरॉइडसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यावर नियमित योगाभ्यासाने उपचार शक्य असून, त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत.
-अनिता पाटील (योगतज्ज्ञ, जळगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT