Hearing on land dispute including encroachment of Erandol to be held on July 27 jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : एरंडोलच्या ‘त्या’ अतिक्रमणाबाबत आता 27 जुलैला होणार सुनावणी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : एरंडोल येथील अतिक्रमणासह जागेच्या वादावर मंगळवारी (ता. १८) जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी झाली. जिल्हाधिकारी मित्तल यांनी दोन्ही पक्षाकडील बाजू ऐकून घेत पुरातत्त्व विभागाकडून जागेबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

त्यासाठी येत्या २७ जुलैला पुन्हा सुनावणी होऊन त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिली. (Hearing on land dispute including encroachment of Erandol to be held on July 27 jalgaon news)

एरंडोल येथील पांडववाडा संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केली होती, की सिटी सर्व्हे क्रमांक ११०० ही पांडववाड्याची जागा असून, त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण झाले आहे, ते काढण्यात यावे.

तर जुम्मा मशीद ट्रस्टतर्फे संबंधित जागेवरील बांधकामासह प्रार्थनास्थळ कायदेशीर आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन ते तीन वेळा सुनावणी झाली. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही कडील बाजू ऐकून घेतली. त्यावर आज निकाल देणे अपेक्षित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, आजही दोन्ही बाजूंकडून पुन्हा आमचीच बाजू खरी आहे, याबाबत पुरावे सादर करण्यात आले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्त्व विभागाने संबंधित जागेबाबत पाहणी करून त्यावर पूर्वी काय होते, याचा शोध घेऊन अहवाल देण्यास सांगितले आहे.

आजच्या युक्तिवादात पांडववाडा संघर्ष समितीतर्फे ॲड. राहुल पारेख, ॲड. अजिंक्य काळे, ॲड. आकाश महाजन, तर जुम्मा मशिद ट्रस्टच्यावतीने ॲड. अब्दुल पिंजारी, ॲड. अहमद सय्यद, ॲड. मजहर पठाण, ॲड. इम्रान साहिल यांनी कामकाज पाहिले. सुनावणीवेळी दोन्ही गटाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. दरम्यान २७ जुलैला होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT