Court Order esakal
जळगाव

Jalgaon News : अवाजवी मालमत्ता कराच्या हरकतींवर 20, 21 ला सुनावणी

सकाळ वृत्तसेवा

रावेर (जि. जळगाव) : शहराच्या वाढीव हद्दीतील आणि जुन्या हद्दीतील मालमत्तेच्या अवास्तव करआकारणीबाबत हरकती नोंदविलेल्या नागरिकांची सुनावणी २० आणि २१ डिसेंबरला घेण्यात येणार आहे. पालिकेच्या मुख्याधिकारी स्वालीहा मालगावे यांनी ‘सकाळ’शी बोलताना ही माहिती दिली.

या दोन दिवशी कार्यालयीन वेळेत पालिकेच्या आठवडे बाजार परिसरातील सभागृहात ही सुनावणी घेण्यात येणार आहे. त्याबाबतच्या नोटिसा हरकती घेतलेल्या नागरिकांना वाटप करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे सादर करण्याचे आवाहन श्रीमती मालगावे यांनी केले आहे. (Hearing on objections of excessive property tax on 20th 21st Jalgaon News)

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

दरम्यान, शहराच्या जुन्या हद्दीतील व नवीन हद्दीतील मिळून सुमारे ३ हजार नागरिकांनी मालमत्ता कराच्या अवाजवी आकारणीबाबत हरकती घेतल्या आहेत. पालिकेने कोणत्याही मूलभूत नागरी सुविधा वाढीव हद्दीत अजूनही दिल्या नसल्याने आपल्याकडून मालमत्ता कर घेऊच नये, अशी काही नागरिकांची भूमिका आहे तर मालमत्ता कर आकारणीचे हे पहिलेच वर्ष असल्याने ६० टक्के ऐवजी २० टक्के कर आकारणी करावी, अशी काही नागरिकांची भूमिका आहे.

जुन्या हद्दीतील करआकारणी देखील अवाजवी झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मागील वर्षी अवघे ८०० रुपये कर आकारणी झालेल्या जुन्या मालमत्तेवर यावर्षी १७ हजार रुपये कर आकारणी झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नगरविकास संचालनालयाचे जळगावचे अधिकारी ही सुनावणी घेणार असून, ते काय निर्णय देतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. आमदार शिरीष चौधरी यांनी विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात याबाबत तारांकित प्रश्नही उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश पहिली यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT