Employees putting up a signboard for the heat stroke room after an inquiry at the district hospital and medical college on Monday  esakal
जळगाव

Jalgaon GMC : जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष नावालाच; असा कक्षच नसल्याची कर्मचाऱ्यांची माहिती!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यासह शहराचे तापमान ४५ ते ४७ अंशावर असताना, जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘उष्माघात’ कक्ष नावाला स्थापन झाल्याचे दिसून येत आहे. (heat stroke room has only for name in district hospital and government medical college jalgaon news)

उष्माघात कक्ष स्वतंत्र असायला हवा, त्यासाठी किमान दहा स्वतंत्र बेड, कुलर, डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबाय असणे गरजेचे आहे. मात्र, असा कक्ष येथे स्थापन झाला नसल्याचे चित्र सोमवारी (ता. १५) रुग्णालयात पाहावयास मिळाले.

सकाळी जिल्हा रुग्णालयात जाऊन उष्माघात कक्ष असल्याबाबत ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरला विचारले असता, असा कक्ष नाही? काय काम आहे, असे विचारत संबंधित दुसऱ्या वॉर्डात गेले. तेवढ्यात त्यांना कल्पना आली असावी, की माहिती विचारणारे पत्रकार असावेत, म्हणून त्यांनी लगेच विचारले तुम्ही पत्रकार का? हो उत्तर मिळताच, असा कक्ष असेल मात्र आमच्या वरिष्ठांना माहीत असेल.

त्यांना ११४ क्रमांकांच्या कक्षात जाऊन विचारा. कक्ष ११४ मध्ये जाऊन उष्माघात कक्षाची विचारणा केली असता, उष्माघात कक्ष असल्याचे सांगण्यात आले. कक्ष दाखविण्यास एक डाॅक्टर सोबत दिला. ते कक्ष क्रमांक एकमध्ये घेऊन गेले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तेथे दुसरेच रुग्ण उपचार घेत होते. उष्माघात कक्षाचा साधा फलकही नव्हता. डॉक्टराने फलक नसल्याचे विचारताच ड्यूटीवरील स्टॉफने कोपऱ्यात पडलेला, साधी प्रिंट काढलेला ‘उष्णाघात कक्ष’ फलक काढून लागलीच बेडवर चिकटविला.

त्या कक्षात उष्माघातसदृष्य रुग्ण दाखल नव्हते. उष्माघात झालेल्या रुग्णावर उपचारासाठी औषधसाठा नव्हता. डॉक्टर, सिस्टरही नव्हते. अचानक अशाप्रकारचे रुग्ण वाढल्यास काय होणार, असा प्रश्‍न यानिमित्त उपस्थित होत आहे.

एकीकडे जिल्हा रुग्णालय व शासकीय महाविद्यालयात मोठमोठ्या शस्त्रक्रिया विनाशुल्क होतात. दुसरीकडे मात्र उष्माघात कक्ष नसणे हे कितपत योग्य, याचा संबंधित यंत्रणांनी विचार करण्याची गरज आहे, असे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT