जळगाव

अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गाचे भाग्य उजळणार !

प्रवीण पाटील

सावदा : मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांना जोडणारा बऱ्हाणपूर - अंकलेश्वर या आंतर राज्य महामार्गाला आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिल्याने या महामार्गाचे भाग्य उजळणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
 

मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात ही तिन्ही मोठी व प्रगत राज्ये आहेत. आणि त्यामुळे या महामार्गामुळे या तिन्ही राज्यांचा संपर्क, व्यवहार, दळणवळण सुविधा कायम राहिल्याने विकासाला चालनाच मिळाली आहे. वाढते उद्योग, वाहनाची वाढती संख्या लक्षात घेता कमी पाहणारा रस्ता आदी बाबी लक्षात घेऊन या महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गत रूपांतर करण्यात यावे, यासाठी खऱ्या अर्थाने चालना मिळाली ती (स्व.) हरिभाऊ जावळे हे खासदार असताना त्यांनी २०१४ मध्ये हा विषय दिल्ली दरबारी मांडला. रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा करून व निवेदन देऊन पाठपुरावाही सुरू ठेवला होता. तीच मागणी पुढे रावेरच्या खासदार रक्षा खडसे व नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित यांनी रस्ते विकास वाहतूक मंत्री गडकरी यांच्याकडे लाऊन धरली आणि तिला यश आले. या महामार्गाला नवीन नंबर देखील मिळाला आहे. 

४४१ किमी लांबीचा मार्ग 
अंकलेश्वर - बऱ्हाणपूर हा एकूण दळणवळणाच्या महत्त्वाचा रस्ता असून, त्याची मध्य प्रदेश ते गुजरातची लांबी ही ४४१ किमी आहे. मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथून सुरू होऊन तो पुढे महाराष्ट्रात रावेर, सावदा, फैजपूर, यावल, चोपडा, तळोदा, शहादा, शिरपूर, अक्कलकुवा, मार्गे पुढे गुजरात राज्यात अंकलेश्वरपर्यंत जातो. केळीचे उत्पादन व निर्यात होते. या महामार्गावर सावदा येथून या तीन राज्यांसह संपूर्ण भारतात ट्रान्स्पोर्टची सुविधा आहे. हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता राष्ट्रीय महामार्ग रूपांतरण होणार असल्याने दळणवळण व विकासाला चालना मिळणार आहे. 


राष्ट्रीय महामार्गामुळे या सुविधा मिळतील 

आता राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित झाल्याने या रस्त्यासाठी भरीव निधी मिळून रस्ता रुंदीकरण होईल. रस्त्याची कामाची गुणवत्ता राखली जाईल. राष्ट्रीय महामार्गावर मिळतात, त्या सुविधा या महामार्गावर मिळू लागतील. नवीन उद्योगांना चालना मिळेल. या महामार्गाचे रुंदीकरण होईल तेव्हा या महामार्गावर येणाऱ्या गावामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण वाढले आहेत ते रस्ता रुंदीकरण वेळी निघून जाईल. हायब्रीड अनुईटी अंतर्गत सुरू असलेल्या पाल - आमोदा या रस्त्याचे कामामुळे या महामार्गावर शहराचे हद्दीतील रस्त्याचे आधीच रुंदीकरण सुरू आहे. तर आता राष्ट्रीय महामार्ग रूपांतरणामुळे पुढे आणखी रुंदीकरण होऊन शहराजवळ हा रस्ता ऐसपैस होईल. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

Mira-Bhayandar: तो हिंदी भाषिक व्यापारी नडला म्हणून मनसे कार्यकर्ता भिडला, 'त्या' व्हायरल व्हिडिओमागची स्टोरी काय?

SCROLL FOR NEXT